शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

'त्या' व्हिडिओनंतर टिकटॉक स्टारचा ६ दिवसांतच मृत्यू; कुटुंबियांसह चाहत्यांना बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 8:54 AM

‘मी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करते’, असे ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती.

गाडी चालविताना अजूनपर्यंत एकदाही माझा अपघात झाला नाही, असा व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही दिवसांतच किशोरवयीन टिकटॉक स्टार कारा सँटोर्ली (वय १८) हिच्या कारचा भीषण अपघात झाला आणि जागीच मृत्यू झाला. अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये १७ मार्चला ही घटना घडली.

उलट्या दिशेने आलेली कार तिच्या कारला धडकली, लगेचच एका गाडीला आग लागली आणि दोन्ही चालकांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच, तिने टिकटॉकवर कार अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांवर टीका करणारा व्हिडीओ शेअर केला होता. बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे यांचे अपघात होतात असे ती म्हणाली होती, त्याच्या पुढच्याच आठवड्यात अवघ्या सहा दिवसांनी ही घटना घडली.

‘मी सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करते’, असे ती त्या व्हिडीओमध्ये म्हणाली होती. अनेकजण माझ्यावर खराब ड्रायव्हर असल्याची टीका करतात; पण मी कधीही एखाद्या व्यक्तीला किंवा गाडीला धडक दिलेली नाही, असे कॅप्शनही व्हिडीओसाठी वापरले होते. तिने तिच्या कारमध्ये बसूनच हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तिच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि चाहत्यांनाही जबर धक्का बसलाय. दरम्यान, तो व्हिडीओ व्हायरल होत असून, १५,०००,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत.  व्हिडीओखाली नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रिया उमटत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातAmericaअमेरिकाTik Tok Appटिक-टॉक