नवी दिल्ली- जर आपण येत्या काही दिवसांत दुबईत प्रवास करण्यात बेत आखत असल्यास सोनं कमावण्याची एक सुवर्णसंधी आहे. फक्त आपण थोडे प्रयत्न केल्यास कोट्यवधी रुपयांचे मालक बनू शकतो. दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर या दिवसांत एक गेम लोकांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या गेमच्या माध्यमातून 20 किलोग्रॅम सोनं प्राप्त करता येणार आहे.20 किलोग्रॅम सोन्याचं बिस्कीट मिळवण्याची ही स्पर्धा सध्या चर्चेचा विषय बनली आहे. खरं तर 20 किलोग्रॅम सोन्याचं बिस्कीट एका काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं आहे. जो कोणी या काचेच्या पेटी हात घालून ते बिस्कीट बाहेर काढेल, त्यांना ते सोनं प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे या चॅलेंजसाठी कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही. हे बिस्कीट दिसण्यात जेवढं हलकं वाटतं तेवढंच ते जड आहे. हे बिस्कीट जड असल्यानं एका हातानं उचलणं शक्य नाही.या चॅलेंजचे बरेचसे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका माणून त्या काचेच्या पेटीत बिस्किट काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक व्हिडीओही प्रसिद्ध झाला आहे. ट्विटरवर विकास ठाकूर यानं एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात एका व्यक्तीनं त्या काचेच्या पेटीत हात घालून सोन्याचं बिस्किट बाहेर काढतानाचं चित्र पाहायला मिळतंय.
व्हायरल सत्य! फक्त एवढंच केल्यास मिळतं 20 किलोग्रॅम सोनं मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 5:14 PM