कधी कधी अशी घटना घडते, जी पाहिल्यानंतर विश्वास बसत नाही. 'पायाखालची जमीन सरकली' ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत पाहायला मिळाला. ही एक खतरनाक आणि थरकाप उडवणारी घटना आहे. कॉलेजच्या पार्टीत अनेक विद्यार्थी एकत्र नाचत आहेत, पण अत्यंत भयानक घटना आहे, जे पाहून सर्वच जण हैराण झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, ग्रॅज्युएशन पार्टीदरम्यान अनेक विद्यार्थी उपस्थित होते आणि आनंदात नाचताना दिसले होते, परंतु यावेळी एक अपघात झाला ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले. पोस्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पेरूच्या सॅन मार्टिनची आहे. 25 हून अधिक विद्यार्थी आनंद साजरा करत नाचत आहेत, पण पुढच्या क्षणी काय होणार हे कोणालाच माहीत नव्हते. ग्रॅज्युएशन पार्टीदरम्यान जमीन खचल्याने 25 विद्यार्थी नाचत असताना खाली पडले.
pop_o_clock नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून अशा ठिकाणी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. या घटनेत किती लोक जखमी झाले आणि पुढे काय झाले याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही, मात्र ज्या लोकांनी हा व्हिडीओ पाहिला त्यांना धक्काच बसला. आतापर्यंत या व्हिडिओला 28 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर लाखो व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"