वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना रोजगार मिळाला हे सर्वांनाच माहीत आहे. इन्स्टाग्रामपासून ते फेसबुकपर्यंत सर्वच प्लॅटफॉर्मवरून अनेकजण बक्कळ पैसा कमवत आहेत. पण कधी कुणी ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर भीक मागण्यासाठीही केला असं ऐकलंय का? पण हे खरंच आहे. खरंतर लोक ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर कशासाठी करतील याचा काही नेम नाही. आता हाच बघाना, न्यूयॉर्कमध्ये एका तरूणाने 'डिजिटल भिकारी' म्हणून लोकप्रियता मिळवली आहे. हा तरूण ट्विटरवरून भीक मागतो आणि आश्चर्याची बाब म्हणजे लोकही त्याला सढळ हाताने भीक देतात. यातून तो आपल्या पगारापेक्षाही जास्त पैसे कमवत आहेत.
नुकताच बनलाय भिकारी
२५ वर्षीय जोवन हिल हा सोशल मीडियाचा वापर भीक मागण्यासाठी करतो. यातून तो महिन्याला लाखो रूपये कमवतो आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या पैशातून तो त्याला भीक देणाऱ्या लोकांसारखी लाइफस्टाइल जगतोय. जोवन हा नुकताच भिकारी झालाय. याआधी तो एका हॉटेलमध्ये काम करत होता. इथे त्याला महिन्याला ९६५ पाउंड म्हणजेच ८७ हजार रूपये मिळायचे. तसेच तो कॉलेजच्या दिवसात घरोघरी जाऊन लोकांना हेल्थ केअर असिस्टेंटची सर्व्हिसही देत होता.
कसा मागतो पैसे?
खरंतर, जोवनचं जगणं हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मिळणाऱ्या भीकेतूनच भागतं. रूमचं भाडं देण्यापासून ते आवडी-निवडी पूर्ण करण्याचा सगळा खर्च त्याचे सोशल मीडिया फॉलोअर्सच उचलतात. आता या महिलेचच बघाना. ती म्हणते की, ती रोज सकाळी उठून कामाला जाते, कारण ती जोवनच्या रूमचं रेन्ट देण्यासाठी पैसे मिळवू शकेल.
लोक किती देतात पैसे?
जोवनच्या ट्विटवरून हे दिसतं की, लोक त्याला त्यांना जमेल तसे पैसे देतात. कुणी १ डॉलर तर कुणी १०० डॉलर देतात. जोवनला ट्विटरवर १ लाखांपेक्षा अधिक लोक फॉलो करतात. त्यांना तो पैसे मागतो. इतकेच नाही तर कधी कधी तो लाइव स्ट्रीमिंग अॅप Periscope चाही आधार घेतो. यावरून तो महिन्याला ५ लाख रूपये कमवतो.
म्हणून लोक देतात पैसे
जोवनला त्याचं नाव फोर्ब्सच्या सर्वात लोकप्रिय बिझनेसमन म्हणून नोंदवायचं आहे. हे त्याचं स्वप्न आहे. त्याला असं वाटतं की, ट्विटरवर त्याचे ट्विट आणि लाइव्ह स्ट्रीमिंग फार मजेदार असतात, हे पाहून त्याचे फॉलोअर्स खूश होतात आणि त्याला पैसे देतात.