Expired medicine hacks : सामान्यपणे सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या दुखण्यासाठी औषधे ठेवली जातात. अनेकदा काही औषधं शिल्लक राहतात आणि कधी एक्सपायर होतात. अशा गोळ्या सामान्यपणे सगळे लोक कचऱ्यात फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या एक्सपायर झालेल्या गोळ्यांचा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
एक्सपायर झालेल्या गोळ्यांचा वापर
- एक्सपायर झालेल्या गोळ्यांचं पावडर तयार करा. हे पावडर स्प्रे बॉटलमध्ये थोड्या पाण्यासोबत मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही झाडांवर स्प्रे करा. याने झाडांवर खतासारखा प्रभाव दिसेल तसेच झाडांना पोषण मिळेल.
- तसेच वॉश बेसिनची स्वच्छता करण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला गरम पाण्यात या गोळ्यांचं पावडर टाका, त्यात थोडा बेकिंग सोडा मिक्स करा. याने वॉश बेसिनमधील ब्लॉकेज मोकळे होतील.
- औषधाच्या गोळ्यांचे रॅपरही तुमच्या कामी येऊ शकतात. हे रॅपर्स पाण्यात उकडून घ्या आणि याने भांडी घासली तर चमकदार दिसतील. काही एक्सपायर झालेल्या औषधांचा तुम्ही टॉयलेट क्लीनर म्हणूनही वापर करू शकता. ही औषधं पाण्यात मिक्स करून टॉयलेट क्लीन करू शकता.