बंगळुरु - अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियात एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसणारी व्यक्ती सिद्धार्थ शुक्ला असण्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक माणूस जीममध्ये वर्कआऊट करत असतानाच त्याला मध्येच अस्वस्थ वाटायला लागतं. त्यानंतर तो जीमच्या बाहेर असणाऱ्या पायऱ्यांवर काही मिनिटं बसतो.
सुरुवातीला या व्हिडीओत त्या व्यक्तीला छातीत वेदना होत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तो पाणी पितो. पुन्हा उभं राहून छातीवर दाब देण्याचा प्रयत्न करत असतो. या व्यक्तीच्या छातीत वेदना होत असल्यानं तो छातीवर दाब देतो तसेच आर्म्स घट्ट पकडतो. हा माणूस सिद्धार्थ शुक्ला असल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर काही वेळानंतर तो माणूस उठून पुन्हा जीमला जातो. परत काही सेकंदात परत येतो आणि पायऱ्यांवर बसतो. त्यानंतर त्याच्या वेदना वाढतच जातात आणि तो खाली कोसळतो. या घटनेचा २ मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ बंगळुरु येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. यात ३३ वर्षीय एक व्यक्ती जीमबाहेरील पायऱ्यांवरुन खाली कोसळताना दिसतो. जीम वर्कआऊट दरम्यान त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्याने तो पायऱ्यांवर जाऊन बसला. पाणी प्यायल्यानंतर तो काही काळ छातीवर दाब देत होता. या घटनेचं CCTV फुटेज व्हायरल होत आहे. २५ ऑगस्ट २०२१ चा हा व्हिडीओ आहे. त्यामुळे यातील व्यक्ती सिद्धार्थ शुक्ला असल्याचं चुकीची माहिती पसरवली जात आहे.
फिजिकल फीट असल्याचं बघितलं जातं. त्याला कुठलाही शारिरीक त्रास आहे का? या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. त्याआधारे जीम ट्रेनरकडून वर्कआऊट दिलं जातं. कुठल्याही वर्कआऊटमुळे ह्दयविकाराचा झटका येणं याची शक्यता नाही. परंतु एखादा मानसिक तणावात असेल आणि तो अतिरिक्त वर्कआऊट करत असेल तर असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीममध्ये वर्कआऊट करताना शारिरीक क्षमतेपेक्षा अतिरिक्त व्यायाम करू नये असा सल्ला जीम ट्रेनर विराज परुळेकर यांनी दिला आहे.