जगात असे बरेच जण आहे ज्यांचे शारीरिक वजन काही ना काही कारणामुळे खूप जास्त वाढते मग त्यांना वजन कमी करण्यासाठी सर्जरी करावी लागते. काही आजही असेच जीवन जगतायेत तर काहींनी जगाचा निरोप घेतला. असाच एक व्यक्ती ज्याचे वजन ४४४ किलो झाले होते. त्यांनी सर्जरी करून स्वत:चे १२० किलो वजन कमी केले होते परंतु हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला.
या व्यक्तीच्या वाढत्या वजनामुळे त्यांच्या आयुष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. या व्यक्तीचं नाव एंड्रेस मोरेनो(Andres Moreno) असं आहे. जे मॅक्सिको इथं राहायला होते. त्यांचे वजन सातत्याने कमी होत होते परंतु डॉक्टरांच्या मते इमोशनल स्ट्रेस आणि हार्ट अटॅक या कारणांमुळे त्यांचा मृत्यू झाला. डेली मेलनुसार, एंड्रेस मोरेनोचं वजन २०१५ मध्ये ४४४ किलो होतो ज्यामुळे जगात सर्वाधिक जाडा माणूस म्हणून त्यांना ओळखलं जायचं. जन्माच्या वेळी बाळाचं वजन २.८ ते ३.२ किलो असते परंतु एंड्रेस यांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वजन ५.८ किलो होते. वयाच्या १० व्या वर्षी एंड्रेसचं वजन ८२ किलो इतके झाले.
एनर्जी ड्रिंक व्यसनी आणि मधुमेही मोरेनो पोलिस अधिकारी बनला आणि नंतर लग्न केले. जसजसा मोरेनो २० वर्षांचे झाला, तसतसे त्याला आरोग्याच्या समस्या येऊ लागल्या. त्याच्या पत्नीने त्याच्या जास्त वजनामुळे त्याला सोडले. त्याची पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर मित्र आणि कुटुंबीय त्याला भेटायला यायचे आणि तो त्यांना त्याच्या स्थितीबद्दल सांगत असे. मृत्यूपूर्वी पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे मोरेनो देखील भावनिक तणावाखाली होते.
मोरेनो यांचे वजन वाढल्याने त्यांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासले. शस्त्रक्रियेपूर्वी, मोरेनोला फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोकडून स्वाक्षरी केलेला रिअल माद्रिद शर्ट देखील मिळाला, ज्याने त्याला तंदुरुस्त राहण्यास प्रवृत्त केले. वजन कमी करण्यासाठी त्याच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली होती आणि डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा ७० टक्के भाग काढून टाकला होता. एंड्रस मृत्यूच्या एक दिवस आधी सहा एनर्जी ड्रिंक्स प्यायला होता, त्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर मृत्यू झाला. मोरेनोला एनर्जी ड्रिंक्सची खूप आवड होती. वजन कमी करण्याचा निर्धार त्याने केला आणि चालायला सुरुवात केली. तो वर्कआऊट करू शकत नव्हता कारण त्यामुळे त्याच्या हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि त्याला हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता होती. अखेर त्याने मोरेनोचा मृत्यू झाला.