ब्रिटनमधून एक फारच प्रेरणा देणारी मनाली भिडणारी बातमी समोर आली आहे. इथे एका ५ वर्षीय मुलाला Oscar Saxelby Lee या ब्लड कॅन्सरशी लढा देत आहे. त्याला उपचारासाठी Stems Cells आणि रक्ताची गरज आहे. आनंदाची बाब म्हणजे त्याच्या मदतीसाठी हजारो लोक धावून आले आहेत. त्याच्याकडे डोनर्सची लाइन लागली आहे. ४८५५ लोक ५ वर्षाच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी समोर आले आहेत.
जोरदार पावसातही गर्दी
(Image Credit : www.telegraph.co.u)
रिपोर्ट्सनुसार, Pitmaston Primary School ने एक ऑनलाइन पोस्ट करून ऑस्करसाठी रक्ताची मागणी केली होती. त्यानंतर अनेक डोनर पुढे आले. यावेळी जोरदार पाऊस होत होता. पण त्याची तमा बाळगता लोक भरपावसात रांगेत उभे होते. असं नाही की, सर्वच ४८५५ लोक एकाच दिवशी इथे आलेत. या लोकांनी ऑस्करला मदत करण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी त्यांचं नाव रजिस्टर केलं आहे.
ऑस्करला ब्लड कॅन्सर आहे. leukemia बोन मॅरोमध्ये होत असतो. त्यामुळे वेळोवेळी रक्ताची गरज पडत असते. दोन-तीन आठवड्यात रक्त बदलावं लागतं. हा फार दुर्मिळ आजार आहे. ऑस्करच्या आई-वडीलांनी सांगितलं की, ऑस्कर फारच खोडकर आहे. Pitmaston शाळेच्या लोकांनी सांगितले की, ते ऑस्करची मदत करण्यासाठी शक्य ते कॅम्पेन चालवत आहेत. इतकेच नाही तर या कॅम्पेनमध्ये लोकांना दोन तीन दिवस सहभाग घेतला. शनिवार २ मार्च आणि ३ मार्चला लोक मोठ्या संख्येने यासाठी हजर झाले होते.
शाळा चालवतीये कॅम्पेन
खरंतर हे कॅम्पेन एक उत्तम उदाहरण आहे की, कशाप्रकारे सर्वसामान्य लोक त्यांच्या लाइफचे काही खास किंमती क्षण एका ५ वर्षाच्या मुलाच्या नावावर करत आहेत. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ज्या व्यक्तींचं रक्त ऑस्करच्या रक्ताशी मॅच करेल त्यांचीच यापुढे गरज असेल. पण इतक्या मोठ्या संख्येने हजर झालेल्या लोकांना पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.