मुंबई/पुणे - सोशल मीडिया असं माध्यम आहे की गल्लीतील गोष्ट तुम्ही लगेचच दिल्लीत पाहू शकता, किंवा दिल्लीतील घटना एका मिनिटांत तुमच्या गल्लीपर्यंत पोहोचते. त्यामुळेच, सोशल मीडियावर कधी काही व्हायरल होईल हे सांगता येत नाही. तसेच, सोशल मीडियातून मजेशीर फोटो, व्हिडिओसह कोट्स आणि नोट्सही व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एका मजेशीर कोट्स लिहिलेला फोटो व्हायरल होत आहे. पुणेरी पाट्या जशा तुम्हाला हसवतात, तशीच ही पाटीही लक्षवेधी ठरत आहे.
पुणेरी पाट्या किंवा पुण्यातील वाक्य ही प्रसिद्ध असून त्यावरुन अनेकदा खिल्ली उडवली जाते. या पुणेरी पाट्यातील काही कोट्स व्हायरलही होतात. मात्र, हे सर्व मराठीत असल्याने ते पुण्यातील आहेत हे लगेचंच ओळखता येते. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या अशीच एक वाक्य लिहिलेली पाटी व्हायरल झाली आहे. ''पता पूछने के ५ रुपये और पते पर पोहोचाने के १० रुपये'' अशी सूचनाच या पाटीत लिहिली आहे. ही पाटी हिंदी भाषेत असल्यामुळे कदाचित ही पुण्यातील नाही.
@priyapalnii नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला असून त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. तर, सोशल मीडियातही हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. कोणी आपल्याला पत्ता विचारुन डिस्टर्ब करु नये किंवा आपल्या सहजासहजी कमाईचं साधन म्हणून कदाचित ही पाटी लिहिणाऱ्याने शक्कल लढवली असेल. मात्र, ही पाटी पाहून तुम्हालाही पुणेरी पाटीची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, ही पाटी कुठली आहे हे माहिती नसून सध्या सोशल मीडियाावर व्हायरल होत आहे.