साप, अजगर समोर अचानक समोर आल्यानंतर काय होईल याचा विचारही आपण करू शकत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. संपूर्ण मुंबई नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत होती. दुसरीकडे मुंबईतील धारावीमध्ये न्यू ईअरचा उत्साह सुरू असताना एक विचित्र प्रकार घडला. धारावीतील एका घराच्या छतावर लोकांनी एक अजगर पाहिला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. या अजगराला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार धारावी पोलिस स्थानकातील परिसरात वाई जंक्शनजवळ एका घरात ६ फूट लांब अजगराने प्रवेश केला. घराच्या छतावरील इतका मोठा आणि धोकादायक साप पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. यानंतर तेथील लोकांनी घरात अजगर सापडल्याची माहिती मुंबई पोलिसांना दिली. माहिती मिळताच मुंबई पोलिस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
याला म्हणतात भक्ती! मंदिरासमोर मारुतीरायाला अखेरचं दंडवत घातलं अन् वानरानं सोडले प्राण
या दरम्यान पोलिस कॉन्स्टेबल मुरलीधर जाधव यांनी जीवाशी खेळत अजगराला पकडून घराच्या बाहेर नेले. जाधव यांनी जीवाशी खेळत अजगर पकडला आणि त्याला बाहेर काढले, तेव्हा मुंबई पोलिसांचा जयजयकार सगळ्यांना ऐकू येत होता.
बोंबला! कोरोनाची लस घ्यायला आलेल्या तरूणालाच नर्सनं केलं प्रपोज; पाहा व्हायरल व्हिडीओ
हा अजगर किती धोकादायक आहे हे आपण व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता. शौर्य दाखवत पोलिसांनी हा अजगर कसा पकडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार पाहायला मिळत असून लोक पोलिसाची प्रशंसा देखील करीत आहेत. व्हिडिओवर आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. नेटिझन्सकडून पोलिस कर्मचार्याच्या शौर्याचे कौतुक होताना दिसून येत आहे.