कृषी विधेयकावरून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन चांगलच पेटून उठलं आहे. शेतकरी आंदोलनाचा आज २९ वा दिवस आहे. पहिल्या दिवसापासूनच शेतकरी मोर्चाचे वेगवेगळे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या आजींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेतकरी आंदोलनाचा आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक ६२ वर्षांच्या आजी थेट पटियालावरुन सिंघू बॉर्डरवर पोहचल्या आहेत.
पटियाला ते सिंघू बॉर्डर हे अंतर २३१ किमी इतकं आहे. किसान एकता मोर्चाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ओपन जीप चालवणाऱ्या या महिलेचा फोटो पोस्ट करुन ही माहिती देण्यात आली आहे. “६२ वर्षीय मनजीत कौर या पटियालावरुन सिंघू बॉर्डरवर गाडी चालवत आल्या आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्या या ठिकाणी आल्या आहेत,” असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलेलं आहे. शाब्बास! पुण्याच्या २ शाळकरी पोरींनी केली कमाल; मंगळ आणि गुरूच्यामध्ये शोधले ६ लहान ग्रह
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता मनजीत या गाडी चालवताना दिसत असून त्यांच्या बाजूला त्यांच्या सहकारी बसल्या आहेत. तर मागील बाजूस उभ्या असणाऱ्या महिला कार्यकर्त्या घोषणा देताना दिसत आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी केंद्राला केंद्राच्या निमंत्रणावर आज निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एकीकडे हे आंदोलन लांबत चालेलं असतानाच दुसरीकडे या आंदोलनाला पाठिंबा आणि विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत या आजींनी मात्र आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. थायलँडच्या राजाच्या प्रेयसीचे शेकडो न्यूड फोटो लीक; अनेक दिवसांपासून राणीशी सुरू होतं भांडण