1956 Viral Advertisement: टेक्नॉलॉजीमध्ये जसजसा विकास होत आहे, त्याप्रमाणे रोजच्या गरजेच्या वस्तूंही अपग्रेड होत आहेत. अनेक मशीन-वस्तू दिवसेंदिवस हायटेक होत आहेत. तुमच्या घरातील फ्रीजच बघा ना. आता फ्रीज आणि 1956 सालातील म्हणजे 66 वर्षाआधी फ्रीज कसा होता हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. भलेही आजच्या जमान्यातील फ्रीज हे ऊर्जा वाचवणारे फ्रीज आहेत. पण मजबूतीबाबत त्यांचं काही सांगता येत नाही. जुने फ्रीज हे फार मजबूत होते. 1956 मध्ये टेक्नॉलॉजी तेवढी विकसित झाली नव्हती. तरीही फ्रीज मात्र मजबूत होते.
सध्या सोशल मीडियावर 66 वर्ष जुनी एक जाहिरात व्हायरल झाली आहे. या जाहिरातीत दाखवलेला फ्रीज जर तुम्ही पाहिला तर आजच्या काळातील फ्रीज विसरून जाल. @lostinhist0ry नावाच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात 66 वर्ष जुन्या फ्रीजची एका जाहिरात दाखवण्यात आली आहे. 1 मिनिट 17 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् व्हाल.
ही जाहिरात पाहिल्यावर तुमच्या हेही लक्षात येईल की, ज्या काळात भारतात सगळीकडे वीज पोहोचली नव्हती त्या काळात अमेरिका आणि यूरोपमध्ये जाहिरात क्षेत्र एक मोठा उद्योग होता. या जाहिरातीत दाखवलेला हा फ्रीज सिंगल डोर फ्रीज आहे. पण त्यात इतकी जागा आहे की, आताच्या डबल डोरमध्येही तेवढी नसेल. 60 वर्षाआधीही हा फ्रीज धडाक्यात लॉन्च करण्यात आला होता. त्याची खासियत पाहून आताच्या फ्रीजची आठवणही राहणार नाही.