सोशल मीडियावर एका सात वर्षांच्या मुलाची तुफान चर्चा रंगली असून व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. चिमुकल्याने आपल्या कुकिंग टॅलेंटने सर्वांवर छाप पा़डली आहे. भाजीपासून चॉकलेट केकपर्यंत, हा मुलगा आपल्या स्वयंपाकघरात सर्वच पदार्थ अगदी अप्रतिम बनवतो. त्याचा असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, लहान मुलगा जिलेबी बनवताना दिसत आहे.
आपल्यापैकी काहीजण स्वयंपाकघरात जिलेबी बनवण्याच्या कल्पनेने घाबरत असले तरी, 7 वर्षांचा हा मुलगा अगदी कमाल करताना दिसत आहे. तो पदार्थ जास्त प्रमाणात शिजवत नाही. जिलेबी बनवण्यासाठी त्याने प्रथम साखरेचा पाक आणि त्यासाठी लागणाऱ्या इतर गोष्टी तयार केल्या आणि मग छोट्या जिलेबी बनवल्या.
चिमुकल्याने प्रत्येक स्टेप अगदी नीट फॉलो केली आणि शेवटी त्याने बनवलेल्या जिलेबीची चव चाखली. लहान मुलाच्या या अनोख्या टॅलेटचं सर्वत्रच भरभरून कौतुक होत असून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. "क्यूट", "वाह" आणि "अप्रतिम" असं म्हणत अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"