प्रेमाला कोणतीही सीमा नसते, ना वयाचे बंधन ना जातीधर्माचे. गरीब असो किंवा श्रीमंत काहीही फरक पडत नाही. असंच एक उदाहरण आहे प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलाचे. एक ८३ वर्षीय विदेशी महिला आणि २८ वर्षीय पाकिस्तानी तरुण एकमेकांच्या प्रेमात असून दोघांनी लग्न केले आहे. जब प्यार किया तो डरना क्या किंवा कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है केहना ते हेच.
पाकिस्तानमधील हाफजाबादच्या काजीपुरमध्ये २८ वर्षीय हाफिज नदीमने निकाह केला तोही एका ८३ वर्षीय वृद्ध महिलेसोबत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही महिला पोलंडची रहिवासी आहे. नोव्हेंबर २०२१ मध्येच दोघांनी लग्न केले आहे आणि त्यांचा सुखाचा संसार सुरु आहे. लग्नाच्या एक वर्षानंतर झालेल्या मुलाखतीत त्यांनी आपली प्रेमकहाणी सांगितली आहे.
कशी झाली दोघांची भेट ?
मुलगा पाकिस्तानचा तर महिला पोलंडची आहे. अर्थात ही भेट झाली सोशल मीडियावरून. फेसबूकवर संवाद साधता साधताच दोघांमध्ये प्रेम फुलले. मग काय दोघांनाही एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागली. ही आतुरता इतकी होती की महिला थेट पाकिस्तानात येऊन पोहचली. त्यानंतर दोघांनी लगेच रितीप्रमाणे निकाह केला.
२८ वर्षीय हाफिज नदीमचा काजीपुरमध्येच स्पेअर पार्ट्स व्यवसाय आहे. सध्या ही वृद्ध महिला आपल्या २८ वर्षीय नवऱ्यासोबत अतिशय खुश आहे. दोघांचा सुखाचा संसार सुरु आहे.