एकाचवेळी जन्मलेली 9 मुले नॉनपलेट 19 महिन्यांनंतर त्यांच्या माली या देशात सुरक्षितपणे परतली आहेत. या मुलांनी यावर्षी मे महिन्यात त्यांचा पहिला वाढदिवसही साजरा केला आहे. मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या या मुलांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एकाच वेळी जन्मलेल्यांची नोंद झाली आहे. 13 डिसेंबर रोजी, सर्व 9 मुले आई हलिमा सिसे आणि वडील अब्देलकादर आर्बीसह मालीची राजधानी बामाको येथे पोहोचली आहेत.
यावेळी मुलांचे वडील आराबे यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहे. मुलांची आई हलिमा सिसे प्रसूतीसाठी मालीहून मोरोक्कोला रवाना झाल्या होत्या, मुलांचा जन्म मे 2021 मध्ये झाला होता. नऊ मुलांमध्ये 5 मुली आणि 4 मुले आहेत.
मुलांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वजन 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम दरम्यान होते. या सर्व मुलांना एक महिना रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यानंतर सर्व मुले मोरोक्कोमधील एका अपार्टमेंटमध्ये राहायला गेली जिथे अॅन बोर्जा क्लिनिकचे डॉक्टर सतत मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवत होते.
सर्व नऊ मुले मालीमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि लोकांना त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी पहायचे आहे. हलिमा सिसेने नऊ मुलांना जन्म देऊन आठ मुलांची आई नाद्या सुलेमानचा विक्रम मोडला आहे. नादियाने 2009 मध्ये आठ मुलांना जन्म दिला होता. मालीचे माजी राष्ट्रपती बाह एन'डॉ यांनी या कुटुंबाला मदत केली. यामुळेच हलीमाच्या एका मुलाचे नाव बाह ठेवले आहे.