शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
2
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
3
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
4
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
5
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
6
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
7
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
8
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
9
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब
10
मुलाखतीत एक चूक अन् कंपनीनं ऑफर केली डबल सॅलरी; महिलेला कसा झाला आर्थिक फायदा?
11
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
12
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
13
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
14
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
15
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
16
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
19
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
20
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान

7 वर्षीय मुलीच्या व्हिडिओला 90 कोटी व्ह्यू, YouTube वरुन केली 200 कोटींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 2:29 PM

अवघ्या 7 वर्षांची सोशल मीडिया स्टार अनास्तासिया रॅडझिंस्काया दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करते.

रशियन सोशल मीडिया स्टार अनास्तासिया रॅडझिंस्काया(Anastasia Radzinskaya) वयाच्या अवघ्या 7 व्या वर्षी इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. अनास्तासिया इतकी लोकप्रिय झाली आहे की, ती दर महिन्याला एक कोटी रुपयांहून अधिकची कमाई करत आहे. सध्या ती 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीची मालक आहे.

वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी अनास्तासिया YouTube च्या सर्वात मोठ्या क्रिएटर्सपैकी एक बनली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी अनास्थासियाने जवळपास 200 कोटी रुपयांची कमाई केली होती. अनास्तासियाच्या या आश्चर्यकारक यशामागे तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे. अनास्तासियाने 4 वर्षांपूर्वी अपलोड केलेल्या एका व्हिडिओला 90 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या चॅनेलला 86 मिलीयन सबस्क्राइबर्स असून, आतापर्यंत एकूण 6900 कोटी व्ह्यू मिळाले आहेत.

कशी होते कमाई?'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, अनास्तासिया रॅडझिंस्काया तिची लक्झरी लाई आणि फॅमिली ट्रीपवर आधारित व्हिडिओ तयार करते. हा कंटेट ती यूट्यूब आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करते. तिचे इंस्टाग्राम आणि यूट्युबवरील टार्गेट ऑडियन्स(प्रेक्षक) हे लहान मुले आहेत. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असून, तिचा कंटेट अनेकांना आवडतो. यातूनच अनास्तासिया खूप कमाई करते.

सुरुवात कशी झाली ?2014 मध्ये अनास्तासियाचा जन्म झाला होता. जन्मापासून अनास्तासियाला सेरेब्रल पाल्सी नावाच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे निदान झाले. परिणामी, तिचे पालक अॅना आणि सर्गेई यांनी त्यांची नोकरी सोडली आणि मुलीसाठी 'लाइक नास्त्य'(Like Nastya) हे YouTube चॅनेल सुरू केले. गेल्या वर्षी अनास्तासिया YouTube सर्वाधिक-पेड कंटेट क्रिएटर्सच्या टॉप 10 यादीत 6 व्या क्रमांकावर होती. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्रामYouTubeयु ट्यूब