शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

90 मिनिटे फक्त बसून रहा आणि विजेता बना! 'इथे' आयोजित केली जाते अनोखी स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 5:06 PM

Space Out : या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ९० मिनिटे काहीच करावं लागत नाही. ना कुणाशी बोलणं, ना हालचाल आणि ना इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर.

Space Out : आजकाल मोबाइल फोन किंवा वेगवेगळ्या डिजिटल डिवाइसचा वापर लहानांसोबत मोठ्यांमध्येही वाढला आहे. सतत या उपकरणांचा वापर करण्याची सवय अनेक समस्या घेऊन येते. अशात साऊथ कोरियामध्ये मोबाइलची सवय सोडवण्यासाठी एक वेगळी पद्धत अवलंबण्यात येत आहे. इथे दरवर्षी अनोखी स्पर्धा घेतली जाते, ज्याला 'स्पेस आउट' असं नाव देण्यात आलंय.

या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना ९० मिनिटे काहीच करावं लागत नाही. ना कुणाशी बोलणं, ना हालचाल आणि ना इलेक्ट्रॉनिक डिवाइसचा वापर. यादरम्यान स्पर्धकांना केवळ शांत बसायचं आहे आणि आपल्या हृदयाच्या ठोक्यांना कंट्रोल करायचं आहे. 

स्पेस आउट स्पर्धकांमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंगच्या आधारावर विजेता निवडला जातो. ज्या स्पर्धकाचा हार्ट रेट सगळ्यात स्थिर राहील त्याला विजेता ठरवलं जातं. या स्पर्धेचा उद्देश लोकांना तणावमुक्त करणं आणि डिजिटल विश्वासपासून थोडा ब्रेक देणं आहे.आजच्या धावपळीच्या जीवनात लोक थोडा वेळही फोनपासून दूर राहू शकत नाहीत. अशात ही स्पर्धा लोकांना ध्यान आणि शांततेची शक्ती शिकवण्याची एक पद्धत आहे. या अनोख्या स्पर्धेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच ही स्पर्धा इतर देशांमध्ये आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. 

साऊथ कोरिया टफ वर्क कल्चरसाठी ओळखला जातो. विकसित देशांमध्ये कामाचे तासही अधिक असतात. २०२३ मध्ये सरकारने आठवड्याचे कामाचे तास वाढवून ६९ तास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. ज्याला भरपूर विरोध झाला आणि शेवटी सरकारला आपला प्रस्ताव मागे घ्यावा लागला होता.

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाSocial Viralसोशल व्हायरल