भयानक कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दरम्यान, बर्याच मन हेलावून टाकत असलेल्या घटना समोर आल्या आहेत. स्मशानभूमीत जळलेली प्रेतं, ऑक्सिजनची कमतरता आणि बहुतेक अहवालांमध्ये लोकांच्या असहायतेची स्थिती सांगितले जाते. दरम्यान, काही सकारात्मक घटना समोर आल्यानं कोरोना काळात सगळ्यांनाच दिलासा मिळत आहे. मध्यप्रदेशातील इंदूरधील एका ९७ वर्षांच्या आजीनं कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे या आजी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोरोनाचा हरवून आफल्या घरी परतल्या आहेत.
९७ वर्षांच्या या आजींचे नाव शांतीबाई दूबे आहे. कोरोना विषाणूला हरवून या आजी घर परत आल्या त्या दिवशी रामनवमी होती.१९२५ मध्ये शांतीबाई यांचा जन्म रामनवमीच्याच दिवशी झाला होता. उज्जैन येथिल रहिवासी असलेल्या शांताबाईंना कोरोनाच्यामुळे 80 टक्के पर्यंत संसर्ग झाला.
४ एप्रिल रोजी त्यांना इंदूरच्या इंडेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गंभीर स्थितीमुळे ऑक्सिजनवर ठेवले होते. तरीसुद्धा इच्छाशक्ती आणि जिद्दीने त्यांनी कोरोनावर विजय मिळविला. वृद्ध महिलेच्या कुटुंबातील लोकांनी सांगितले की, ''4 एप्रिल रोजी त्यांची तब्येत बिघडली होती. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर त्यांना उज्जैनच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती सुधारली नाही. सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात 80 टक्के संसर्ग दिसून आला. त्यानंतर त्याला इंदूरला नेण्यात आले. अशा स्थितीतही आजींनी कोरोनाला हरवल्यामुळे कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ''
या गावात १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही
राजस्थानच्या सुखपूरा गावात १३ महिन्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. जेव्हा मागच्यावर्षी लॉकडाऊन लावण्यात आला होता तेव्हा या गावानं आपल्या गावाला जोडत असलेले सगळेच मुख्य रस्ते बंद केले होते. याशिवाय बाहेरून गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची तपासणी सुरू केली होती. सुरूवातीपासूनच या गावातील लोकांनी सावधगिरी आणि नियमाचे पालन करण्यास सुरूवात केली होती.
राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खंडेलाच्या सुखपूरा गावातील लोकांनी कोरोनाच्या माहामारीत आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन केले. ३००० लोकसंख्या असलेल्या गावात वैश्विक कोरोना माहामारीत गेल्या १३ महिन्यांपासून एकही पॉझिटिव्ह केस आलेली नाही. मागच्यावर्षापासून त्यांनी गावात प्रवेश करत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांना आत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता.