युट्युबवर बघून १२ वर्षाच्या मुलाने बनवली दारू; शाळेतील मित्रांनी पिताच गाठलं हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 12:08 PM2022-07-31T12:08:16+5:302022-07-31T12:09:56+5:30
केरळमधील एका १२ वर्षीय शाळकरी मुलाने युट्युबवर पाहून दारू बनवली आहे.
नवी दिल्ली : सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे, इंटरनेटवर सर्वकाही उपलब्ध आहे. अनेक विद्यार्थी इंटरनेटच्या साहाय्याने अभ्यास करून मोठ-मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये भरघोस यश मिळवतात. इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय जाळे हे युट्युबचे आहे. काही लोक युट्युबवर व्हिडीओ पाहून अपराध करतात तर काही ज्ञान आत्मसात करतात. सध्या केरळमधील एक घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण इथे १२ वर्षाच्या मुलाने युट्युबवरून दारू बनवण्याचे कौशल्य शिकले आहे. मात्र दारू बनवल्याने मुलांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे.
दरम्यान, अलीकडेच मुलाने युट्युबवर व्हिडीओ पाहून वाइन बनवली आहे. मात्र ही वाइन या शाळकरी मुलाच्या मित्रांनी पिल्यानंतर त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कारण ज्या मुलांनी ही वाइन पिली ती सर्व मुले अचानक आजारी पडली आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने (PTI)दिलेल्या माहितीनुसार, युट्युबवर एक व्हिडिओ पाहिल्यानंतर एका १२ वर्षांच्या मुलाने स्वतः द्राक्षांची वाइन बनवली त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
द्राक्षांपासून बनवली दारू
दारू पिलेल्या शाळकरी मुलांची तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. माहितीनुसार, हा जीवघेणा प्रयोग एका सरकारी शाळेतील विद्यार्थ्याने केला होता. पोलिसांना माहिती मिळताच खटला दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, "आम्ही चौकशी केली असता मुलाने कबूल केले आहे की त्याने त्याच्या पालकांनी विकत घेतलेल्या द्राक्षांचा वापर करून वाइन बनवली होती. त्यांने त्यामध्ये इतर कोणतेही अल्कोहोल घटक वापरले नाहीत. वाइन तयार केल्यानंतर त्याने ती बाटलीत भरली आणि युट्युब व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती जमिनीखाली पुरली.