एका युवतीचं स्वत:च्या वयापेक्षा ४० वर्ष अधिक वयाच्या पुरुषावर प्रेम झालं. या कपलनं लग्नही केले. मात्र त्यानंतर आता सोशल मीडियावर या जोडप्याच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. २३ वर्षीय मारिया एड्डआरडा डियास आणि ६३ वर्षीय निक्सन मोट्टा यांनी टिकटॉकवर व्हिडिओ बनवून दोघांच्या नात्याचा बचाव केला आहे. त्यांनी टीकाकारांना प्रत्युत्तर देत त्यांची बोलती बंद केली.
हे जोडपे ब्राझीलच्या कॅपिना ग्रँड शहरात राहते. जोडप्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला. त्यावर मुलीने पैशांसाठी जास्त वयाच्या पुरुषाशी लग्न केले अशी टीका नेटिझन्सकडून करण्यात आली. द सनच्या रिपोर्टनुसार, मारिया निक्सन यांची पहिली भेट जेव्हा मारिया १६ वर्षांची होती तेव्हा झाली. मागील वर्षी जून महिन्यात हे दोघेही विवाह बंधनात अडकले. जोडप्याच्या नातेवाईकांनीही त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. मारिया आणि निक्सन या दोघांना एक मुलगीही आहे.
६३ वर्षीय निक्सन मोट्टा व्यवसायाने रेडिओ डिजे आहेत. या दोघांमधील वयाच्या अंतरामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियात त्यांच्यावर टीका व्हायची. आता सोशल मीडियावर या दोघांनी टाकलेल्या व्हिडिओनं बरीच चर्चा केली आहे. लग्नानंतर जोडप्याने त्यांच्या लव्ह लाईफबद्दल व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या जोडप्याला ट्रोलही केले आहे.
एका सोशल मीडिया यूजरनं म्हटलं की, या दोघांचे नाते कधीच सामान्य असू शकत नाही. त्यावर मारिया म्हणाली की, मला अपेक्षा होती सकारात्मकरित्या आमच्या नात्याला स्वीकारलं जाईल. काय सुंदर लव्हस्टोरी आहे असं लोक बोलतील. परंतु असे काही झाले नाही. अनेकांनी मला प्रायव्हेट मेसेज करत माझ्या नात्याला पाठिंबा दिला असं ती म्हणाली. तर अनेकांनी आमच्या नात्यावर खूप टीका केली. जी लोकांकडून अपेक्षा नव्हती अशी खंत निक्सनने बोलून दाखवली.
"मी श्रीमंत नाही, लोकांचा विचार चुकीचा"पैशांसाठी मारियाने निक्सनसोबत लग्न केले असं यूजर्स म्हणतात. त्याला उत्तर देताना निक्सन म्हणाले की, मी श्रीमंत नाही. आम्ही काही भेटीत एकमेकांच्या खूप जवळ आलो. सुरुवातीला मित्रांप्रमाणे आम्ही बाहेर भेटायचो, फिरायला जायचो असं त्यांनी म्हटलं. तर आम्ही एकमेकांच्या सहमतीने लग्न केले. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर त्याच्यासाठी लढायला हवं. मग त्या नात्यात वयाच अंतर असो वा कुठलीही अडचण असं मारियाने लोकांना सांगितले.