देवरिया : या जगात सर्वात जास्त माणुकीला किंमत असते असे घरातील ज्येष्ठ नागरिक नेहमी सांगत असतात. माणसाने दयाळूपणाची भावना बाळगली पाहिजे कारण ती केवळ माणुसकीच नाही तर इतरांबद्दल प्रेम देखील दर्शवते. आपल्याला दुकानाजवळ नेहमी गोळ्या, बिस्किटे खाताना लहान मुलांची वरदळ पाहायला मिळते. काही अनाथ मुले लोकांकडून पैसे मागून आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र एका दुकानदाराने अनाथमुलांसाठी बेकरीतील केक मोफत देण्याचे ठरवले आहे. १४ वर्षांपर्यंतच्या अनाथ मुलांना या बेकरीतील केक मोफत मिळणार आहे. या दुकानदाराचे सर्वजण करत असून आयएएस अधिकारी अवनीश शरण (Awanish Sharan) यांनी दिलेल्या माहितीनुसार ही बेकरी उत्तर प्रदेशमधील आहे.
अनाथ मुलांसाठी मोफत केकदुकानदाराने बेकरीमधील काउंटरजवळ एक पाटी लावून या ऑफरची माहिती दिली आहे. "मोफत मोफत मोफत! ज्या मुलांना आई-वडील नाहीत अशा ० ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना केक मोफत", अशा आशयाची पाटी सर्वांना आकर्षित करत आहे. IAS अधिकारी अविनाश शरण यांनी या बेकरीचा फोटो शेअर करून बेकरी मालकाचे विशेष कौतुक केले आहे. तसेच एका युजर्सच्या कमेंटला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, ही बेकरी देवरिया उत्तर प्रदेश येथील आहे. दरम्यान, आयएएस अधिकाऱ्यांनी फोटो शेअर करून बेकरी मालकाचे मोठे मन समोर आणले आहे.
सोशल मीडियावर नेहमी अशा मोठ्या मनाच्या व्यक्तींची चर्चा होत असते. यापूर्वी मुलांबद्दलच्या दयाळूपणाबद्दल एका वाहतूक पोलिसाचे कौतुक केले गेले होते. हवालदार सिरूपंगी महेश कुमार यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन तेलंगणा पोलिसांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांना व्हायरल केले होते. बेघर मुलांबद्दलच्या दयाळू वर्तनाबद्दल वाहतूक पोलिसाचे कौतुक करण्यात आले. पंजागुट्टा स्टेशनवर तैनात असलेल्या महेश यांना सोमाजीगुडा येथे ड्युटीवर असताना रस्त्यावर दोन अनाथ मुले पाहिली. ती मुले कचऱ्याच्या डब्ब्यात खायला काय मिळते का हे पाहत होते. तेवढ्यात महेश यांनी आपल्या जेवणाचा डब्बा त्यांना भोजनासाठी दिल्याने त्यांचे खूप कौतुक झाले होते.