सोशल मीडियामुळे अनेकांचं टॅलेंट जगासमोर येतं. लोकांकडे एवढया कला आहेत जे पाहून आश्चर्य वाटतं. असाच एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. यामध्ये एक कलाकार चक्क धुळीतून सुंदर चित्र रेखाटत आहे. घरातील अडगळीच्या ठिकाणी धूळ जमा झालेली असते त्यावर हा पठ्ठ्या चक्क एका महिलेचं चित्र काढताना दिसत आहे.
ps.rathour या युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. घरातील बाल्कनीत धूळ साचली आहे आणि ती साफ करण्यासाठी तो वायपर घेऊन जातो. त्याने लिहिले, 'एका कलाकाराला जेव्हा धूळ दिसते...' क्षणात तो वायपरने धूळीवरच चित्र रेखाटायला सुरुवात करतो. महिलेचा सुंदर चेहरा बनवताना आयब्रो, डोळे, केस, कपाळावर टिकली असं तो काढतो. शेवटी सुंदर चित्र पूर्ण होतं. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "वायपरचा असाही उपयोग आणि मी पहिल्यांदाच चित्र काढण्यासाठी हे टुल वापरलं आहे."
त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. त्याच्या टॅलेंटची अनेकजण स्तुती करत आहेत. 'याच्याकडे असं टॅलेंट आहे जे कोणीही कॉपी करु शकत नाही', 'याच्या कलेची स्तुती करण्याएवढे शब्दही नाहीत'. अशा कमेंट्स त्याच्या व्हिडिओवर आल्या आहेत.