Social Media : सोशल मीडियाला माहितीचे भांडार म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जगाच्या पाठीवर कुठं काय घडतंय याची पुरेपूर माहिती इथे मिळते. अगदी एखाद्या माणसाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढणं म्हणजे मोठं कौतुकाचं काम आहे. सोशल मीडियावर असाच एका बस कंडक्टरच्या कामगिरीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
सध्या सोशल मीडियावर केरळमधील एका बसचा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की भरधाव वेगाने रस्त्यावर एक बस चाललेली आहे. या बसमध्ये ड्रायव्हर, कंडक्टरसह काही प्रवासी देखील आहेत. त्यातच प्रवासी गाडीमध्ये चढल्यानंतर कंडक्टर त्यांची तिकिटे काढण्यात व्यस्त होतो. बसमधील सीटचा टेकू घेत हा कंडक्टर दरवाज्यात उभ्या असणाऱ्या एका प्रवाशाचे तिकिट काढताना दिसतोय. त्यातच अचानक ड्रायव्हर बसला ब्रेक मारतो आणि त्यामुळे दरवाज्यात उभ्या असणाऱ्या तरुणाचा तोल जातो. कंडक्टर प्रसंगावधान राखत त्या तरुणाला हात देतो आणि त्याला बसच्या आतमध्ये खेचतो. बस कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे तो तरुण बचावला हे सत्य नाकारता येणार नाही. हे दृश्य पूर्णपणे सिनेमॅटिक असल्यासारखं वाटतंय.
एक्सवर @ Ghar ke kalesh या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी बस कंडक्टरच्या कामगिरीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवाय काहींनी तर व्हिडिओवर कंमेंटचा वर्षाव केलाय.त्यातील एक नेटकरी म्हणतो, "स्पायडरमॅन कंडक्टर" तसेच आणखी एक यूजर म्हणतो, "केरळचा रंजनीकांत" अशी प्रतिक्रिया त्याने या व्हायरल व्हिडिओवर दिली आहे.