सोशल मीडियावर दररोज नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिझनेस टायकून हर्ष गोयंका यांनी एका शहराचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुमचाही तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हे शहर जमिनीवर नाही, तर नदीवर उभ्या असलेल्या पुलावर वसलेले आहे.
नदीवरील पुलावर घरे...ही वस्ती चीनमधील चोंगक्विंगमधील अशा प्रकारची पहिली वस्ती आहे, ज्यामध्ये संपूर्ण पुलावर रंगीबेरंगी घरे बांधण्यात आली आहेत. या पुलावर बांधलेल्या टाऊनशिपच्या खालून एक सुंदर नदी वाहत आहे तर आजूबाजूला हिरवळ पसरलेली दिसत आहेत. हर्ष गोएंका यांनी हा वस्तीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
फेरी टेल हाऊसया व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देत आहेत. काही लोक या गावाला परीकथेतील गाव म्हणत आहेत, तर काही लोक घरं बांधण्यासाठी जमीन मिळणे कठीण झाले आहे, मग गरीब जनतेने काय करावे, असे म्हणत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, हे विलक्षण आहे पण फक्त खांब मजबूत असले पाहिजेत, जेणेकरून ही घरे कोसळणार नाहीत.
शहरात 13000 हून अधिक पूल चायना डेलीच्या रिपोर्टनुसार, 400 मीटर लांबीच्या पुलावर बांधलेली ही टाऊनशिप पर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. चोंगकिंग या पर्वतीय शहरात 13,000 हून अधिक पूल आहेत. यापूर्वी निरुपयोगी असलेले अनेक पूल शहरातील पॉकेट पार्क, क्रीडांगणे, मनोरंजन क्षेत्र, पदपथ आणि वाहनतळांमध्ये रुपांतरित झाले आहेत. ब्रिज आणि रेल्वे वाहतूक या चोंगकिंगच्या दोन खास ओळख आहेत.