Social Viral : हल्ली सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा काही नेम नाही. लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाला मोबाईलचे वेड आहे. पण या सोशल मीडियाचे जितके फायदे आहेत तितकेच तोटे देखील पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय हा व्हायरल व्हिडीओ पाहून येईल.
जगभरात क्रिकेटप्रेमींप्रमाणेच फुटबॉल प्रेमींचींही काही कमी नाही. यासाठी लोक आपल्या आवडीच्या संघापासून ते प्लेअरसाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. आपली टीम जिंकलीच पाहिजे, असा अट्टाहास त्यांचा असतो. जर एखादा चाहत्याला आवडणारी टीम स्पर्धेत हरली तर ते अपयश पचवणेही काहींसाठी अवघड होऊन बसते.
सुपर बाऊल २०२४ ही रोमांकारी फुटबॉल मॅच कैनसस सिटी चीफ्स आणि सैन फ्रांसिस्को 49ers या दोन संघात झाली. अतीतटीच्या लढतीत कैनसस सिटी चीफ्सने सैन फ्रांसिस्को 49ers संघाला पराभवाची धूळ चारली. चीफ्स समर्थकांनी आपला संघ जिंकल्याने मोठा जल्लोष केला पण याउलट 49ers च्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. त्याच दरम्यान टीव्हीवर या दोन संघांमधील मॅच पाहाणाऱ्या एका 49ers समर्थकाला राग अनावर झाला. आपला आवडता संघ पराभूत झाल्याने त्या रागात या फॅनने चक्क राहत्या घरातील टीव्ही फोडला. त्याने या खेळासाठी संघावर 20 हजार डॉलरची पैज लावली होती, त्यामुळे तो 49ers च्या पराभवामुळे नाराज झाला होता. या व्हिडीओमध्ये त्या चवताळेल्या तरुणाला एक व्यक्ती शांत करताना दिसतोय. पण या तरुणाने रागाच्या भरात येऊन भींतीवर असलेला टीव्हीवर एका बुक्कीत फोडला. असं व्हिडीओतून स्पष्ट होतंय.
सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे. तसेच या तरुणाचे हे कृत्य पाहून अनेकांनी डोक्यालाच हात लावला आहे.