कुशीनगर ।
प्रेमामध्ये जात, धर्म, पंथ आणि रंग यांना थारा नसतो असं बोललं जात मात्र हे सत्य देखील आहे. प्रेमामध्ये व्यक्तीची जात अथवा पंथ याचा विचार न करता आयुष्याचा जोडीदार ठरवला जातो. अनेक लोक आपल्या प्रेमासाठी प्रसंगी जीव देखील देतात. तर काही लोक सर्व संकटांवर मात करून आपले प्रेम मिळवतात. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे असाच एक प्रकार घडला आहे. कारण या अनोख्या प्रेमविवाहाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या प्रेम कहाणीमध्ये एक गावठी मुलगा आणि एक रशियन मुलगी यांचा विवाह पार पडला आहे. लक्षणीय बाब म्हणजे या लग्नासाठी वऱ्हाड रशियातूनउत्तर प्रदेश येथे दाखल झालं होतं.
दरम्यान, या लग्नासाठी चार देशातील वऱ्हाडींनी हजेरी लावली होती. माहितीनुसार, कुशीनगरमध्ये राहणाऱ्या या मुलाचे नाव दीपक आहे. तर रशियात राहणाऱ्या नववधूचे नाव जोया असं आहे. मेडिकल कॉलेजमध्ये असताना दोघांचीही एकमेकांशी ओळख झाली. मेडिकलचा अभ्यास करण्यासाठी दीपक ऑस्ट्रियाला गेला होता. तिथे त्याची भेट रशियात राहणाऱ्या जोया सोबत झाली. दोघांमध्ये प्रथम मैत्री झाली नंतर हळहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही कालावधीनंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
वऱ्हाडी मंडळी उत्तर प्रदेशात दाखललक्षणीय बाब म्हणजे लग्नासाठी वऱ्हाडी मंडळीनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे हजेरी लावली. या लग्नामध्ये दोघांच्याही विदेशी मित्रमंडळीचा समावेश होता. लग्नामुळे दोन्ही पार्टीतील कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र या अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली असून कुशीनगरच्या पंचक्रोशीतील लोकांना अनोखा विवाह पाहून धक्का बसला आहे. सध्या या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे आणि याचे फोटो देखील सर्वत्र व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे लग्नाला ४ देशातील लोकांनी हजेरी लावल्यामुळे या अनोख्या लग्नाने सर्वांचेच लक्ष वेधले.