अमेरिकेत गुरुवारी एका कैद्याला मृत्युची शिक्षा देण्यात आली. ६१ वर्षीय ट्रेसी बीटी नावाच्या या व्यक्तीने २० वर्षांपुर्वी स्वत:च्याच आईची हत्या केली आणि बागेत पुरले. बुधवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बीटी यांच्या वकिलाने केलेली फाशीची शिक्षा रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली. वकिलांनी न्यायालयात सांगितले की बीटी हे मानसिक रुग्ण असून त्यांची शिक्षा माफ झाली पाहिजे.
ट्रेसी बीटी यांना हंट्सविले येथील तुरुंगात एक घातक इंजेक्शन दिले गेले. इंजेक्शन दिल्यानंतर १७ मिनिटांनी संध्याकाळी ६ वाजून ३९ मिनिटांनी मृत घोषित केले. पेंटोबार्बिटलचे हे इंजेक्शन नसांमध्ये टोचले गेले. अमेरिकेत वेगवेगळ्या जिल्ह्यात मृत्युची शिक्षा देण्याचे वेगवेगळे नियम आहेत. भारतात फाशीची शिक्षा दिली जाते.
शिक्षेची प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी बीटी यांनी आपल्या पत्नीसोबत बातचीत केली. मी तुला सोडून जाऊ नाही, तुझ्यावर प्रेम करतो तिकडे पोहचल्यावर भेटूच असे त्याने पत्नीला सांगितले.