शहरं
Join us  
Trending Stories
1
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
2
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
3
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
4
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
5
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
7
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
8
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
9
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
10
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
11
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
12
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
13
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
14
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
15
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
16
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
17
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
18
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
19
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
20
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ

खतरों का खिलाडी! रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपला, नंतर एक्स्प्रेस आली अन् उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 5:22 PM

Railway Viral Video News: सोशल मीडियावर एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. एक व्यक्ती रेल्वे रुळावरच ढाराढूर झोपल्याचे या व्हिडीओत दिसत असून, ही घटना उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. 

Viral Video Latest News: रेल्वे रुळावर डोक, गालाखाली हात अन् छत्रीची सावली... अशा अवस्थेत एक व्यक्ती ढाराढूर झोपलेला असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्यक्तीला इतकी गाढ झोप लागली की, एक्स्प्रेस गाडीचा हॉर्नही त्याला ऐकू आला नाही. एक्स्प्रेस गाडी वेळीच थांबली नसती, तर त्याला प्राण गमावावे लागले असते. पण, म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी, तसंच काहीसे इथे घडलं आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील प्रयागराजवरून मऊआयमा मार्गे प्रतापगढला जाणाऱ्या मार्गावर हा प्रकार घडला. 21 ऑगस्ट रोजीची ही घटना आहे. प्रयागराज स्थानकावरून एक्स्प्रेस निघाली होती. मऊआयमा पार करून गाडी पुढे रेल्वे पुलावर पोहोचली. समोरचे दृश्य पाहून लोको पायलटला धक्काच बसला. 

छत्रीचा आसरा अन् ढाराढूर झोपला

एक मध्यवयीन व्यक्ती रेल्वे रुळावरच झोपलेला होता. ऊन आणि पावसापासून बचाव व्हावा म्हणून त्याने छत्रीही उघडून ठेवली होती. हा व्यक्ती इतका गाढ झोपलेला होता की, त्याला ना रेल्वेचा आवाज ऐकू आला, ना हॉर्नचा. या झोपलेल्या व्यक्तीला बघून लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत एक्स्प्रेस थांबवली. 

लोको पायलट खाली उतरला. गाढ झोपेत असलेल्या व्यक्तीला त्याने जवळ जाऊन उठवले. तोपर्यंत काही लोकही तिथे जमा झाले होते. या सगळ्या घटनेचा काही मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. 

लोकांच्या मजेशीर कमेंट्स 

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटलं आहे की, 'यमराज या लोको पायलटला कधी मनापासून माफ करणार नाही.' दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटले आहे की, 'रेल्वे रुळावर खूप चांगली झोप येते, कधीच झोपू नका.' आणखी एकाने म्हटलंय की, यमराज सुट्टीवर होते, नाहीतर हा आता अप्सरासोबत दिसला असता.'

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलIndian Railwayभारतीय रेल्वेTwitterट्विटर