नवी दिल्ली - अनेक जण नातेवाईकांसमोर त्यांच्या श्रीमंतीचा बडेजाव करत नाहीत कारण त्यांच्यामुळे श्रीमंतीला नजर लागेल असं त्यांना वाटते. परंतु एक व्यक्ती असा आहे जो त्याच्या आईवडिलांसमोरच गरीब असल्याचं नाटक करतो. या व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित मी खूप श्रीमंत आहे तरीही कुटुंबासमोर गरीब असल्याचं नाटक करतो असं सांगितले. तो असा का करतोय याचं कारणही हैराण करणारे आहे.
त्याने रेडिटवर ट्रू ऑफ माई चेस्ट थ्रेडवर पोस्ट लिहित म्हटलंय की, मी कुटुंबासमोर माझ्या आर्थिक परिस्थितीचं सत्य कधीही सांगत नाही कारण माझ्या कुटुंबाने माझा फायदा घेतला आहे. ते नेहमी माझ्याकडे पैशांची मागणी करतात. माझ्या घराला फ्री वेकेशन समजून कधीही येतात. मी एक कोट्यधीश आहे. परंतु जेव्हा माझे कुटुंब मला भेटायला येते तेव्हा मी स्वस्त अपार्टमेंटमध्ये घर भाड्याने घेतो कारण मी तिथेच राहतो हे मला दाखवायचं असते असं त्याने सांगितले.
तसेच मी हे पहिल्यांदा परदेशात शिक्षणासाठी गेलो तेव्हा सुरू केले. कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशननंतर नोकरी मिळाली. माझ्या आईने पहिला प्रश्न केला तू किती पैसे कमावतो? मी जेव्हा त्याला उत्तर दिले तेव्हा आई वडिलांना वाटले मी श्रीमंत आहे. त्यानंतर त्यांचा स्वभाव हळूहळू बदलू लागला. मात्र मी ज्या देशात पैसे कमावत होतो तेथील करेन्सीनुसार माझा पगार खूप कमी होता असं युवकाने सांगितले.
फ्री वेकेशन समजून कधीही यायचेजेव्हा माझा पहिला पगार मिळाला तेव्हा आई वडील मला भेटायला आले. मला येण्याजाण्यापासून प्रत्येक गोष्टीचा खर्च करावा लागला. त्यांनी माझी चिंता केली नाही. त्यांना फ्रि वेकेशन हवे होते. मला टूर गाइड आणि एटीएम बनवून ठेवले. इतकेच नाही तर घरातील इतर लोकही मज्जा मारण्यासाठी माझ्याकडे येऊ लागले.
मी जेव्हा घरी यायचो तेव्हा माझ्याकडे गिफ्टची अपेक्षा ठेवायचे. प्रत्येकवेळी बाहेर जायचो तेव्हा बिल मलाच भरायला सांगायचे. भाऊ बहिणीच्या स्कूल, कॉलेज आणि ट्यूशनची फीही मला भरायला सांगितली. माझ्या घरचे किती स्वार्थी आहेत ते मला कळाले. मी आता त्यांचा फोन, मेसेज हळूहळू बंद केला. माझ्या आयुष्याशी निगडीत गोष्टी कमी सांगू लागलो.
पेंटहाऊसला २ सूटकेस आणि स्वस्त अपार्टमेंटमध्ये राहायला जातोकोरोना महामारी सुरू झाल्यानंतर मी माझा बिझनेस सुरू केला. तो खूप चांगला चालला. त्यानंतर नोकरी सोडली. मात्र घरच्यांना माझी नोकरी गेली, मी आर्थिक परिस्थितीशी लढतोय असं खोटं सागंतिले. त्यानंतर कुटुंबाने माझ्याशी बोलणे कमी केले. मात्र त्यानंतर मी पुन्हा नोकरी लागली परंतु पगार कमी आहे म्हटलं. आता जेव्हा कधी ते माझ्या घरी येतात तेव्हा फ्लाईटपासून सगळा खर्च ते स्वत: उचलतात. मी गरीब असल्याचं त्यांच्यासमोर नाटक करतो.