शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

महिला डॉक्टरचा सफाई कर्मचाऱ्यावर जीव जडला; स्वत:हून प्रपोज करत थेट लग्नच केले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 5:30 PM

शहजाद आणि किश्वर साहिबा या दोघांची लव्हस्टोरी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे

प्रेमात जातपात, गरीब श्रीमंत, वय हे काहीच दिसत नाही. प्रेम कधीही, कुणालाही आणि कुणाशीही होऊ शकते. याचेच एक उदाहण पाकिस्तानात पाहायला मिळत आहे. ज्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. याठिकाणी एका महिला डॉक्टरचा सफाई कर्मचाऱ्यावर जीव जडला. तिनेच त्याला प्रपोज केले त्यानंतर या दोघांनी लग्नही केले. पाकिस्तानच्या ओकारा जिल्ह्यातील दीपालपुर येथील हे जोडपे राहायला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, या सफाई कर्मचाऱ्याचं नाव शहजाद असं आहे. तर महिला डॉक्टरचं नाव किश्वर साहिबा असं आहे. दोघांनी एक यूट्यूब चॅनेलही बनवला आहे. ज्याच नाव किश्वर विलेज व्लॉग असं आहे. या चॅनेलवर विविध प्रकारचे व्हिडिओ बनवून शेअर केले जातात. सफाई कर्मचाऱ्यासोबत डॉक्टर महिलेने लग्न केल्यानंतर मेरे पाकिस्तान नावाच्या यूट्यूब चॅनेलने त्यांची मुलाखत घेतली. 

या मुलाखतीत शहजादनं सांगितले की, माझ्या आयुष्यात एक डॉक्टर लाईफ पार्टनर म्हणून येईल असा मी कधीही विचार केला नव्हता. तर शहजादची पर्सनॅलिटी खूप आवडत होती. तो नेहमी नजर खाली करून माझ्याशी बोलत होता. शहजादला पाहून वाटलं नव्हतं तो सफाई कामगार असेल अथवा चहा बनवणारा असेल. शहजादचा स्वभावही मला भावला. त्यामुळे शहजादसोबत निकाह करण्याचा मी निर्णय घेतला असं महिला डॉक्टर किश्वर साहिबा यांनी म्हटलं. 

महिला डॉक्टरनेच केला प्रपोजशहजाद आणि किश्वर साहिबा या दोघांची लव्हस्टोरी सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. शहजाद सांगतो की, डॉक्टर साहिबा माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात याचा अंदाजही मला नव्हता. डॉक्टर किश्वराने माझा नंबर मागितला. तो नंबर त्यांनी सेव्ह करून घेतला. एकेदिवशी स्वत: त्यांनी प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर आम्ही दोघं सुरुवातीला एकमेकांना भेटत होतो. काही दिवसांनी आम्ही लग्न केले. लग्नानंतर अनेकांनी किश्वर साहिबा डॉक्टरला टोमणे मारण्यास सुरुवात केली. लोकांची बोलणी ऐकून किश्वराने नोकरी सोडून स्वत:चं क्लिनिक उघडण्याचा निर्णय घेतला. सध्या हे दोघं आनंदाने जीवन जगत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल