नवी दिल्ली : रागात कोण काय करेल याची कल्पना करणे देखील कठिण असते. सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीच्या संकटाने आपले पाय पसरले आहेत. अनेक तरूण कोरोनामुळे रोजगारापासून वंचित असतानाच काहींना आपल्या नोकरीवरून काढले जात आहे. कॅनडातील एका व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकल्याने त्याने जे काही केले त्याची खूप चर्चा रंगली आहे. आपल्याला नोकरीवरून काढल्याचा बदला घेण्यासाठी कर्मचाऱ्याने चक्क बॉसचा आलिशान बंगला जमीनदोस्त केला आहे.
डॉन टॅपस्कॉटच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅनडातील कॅलगरी येथील एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसचा घेतलेला बदला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉसच्या म्हणण्यानुसार त्या कर्मचाऱ्याने चोरी केली आहे म्हणून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. याच रागात कर्मचाऱ्याने जेसबीच्या साहाय्याने आपल्या बॉसचा आलिशान बंगला तोडला आहे. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून याची खूप चर्चा रंगली आहे.
कामावरून काढल्याने तोडला बंगलामाहितीनुसार, बॉसने चोरीच्या आरोपाखाली कर्मचाऱ्याची नोकरीवरून हकालपट्टी केल्याने बॉसला कर्मचाऱ्याच्या संतापाला सामोरे जावे लागले. शुल्लक कारणावरून असा प्रताप करण्याची काय गरज होती असे आता बॉस म्हणत आहे मात्र कर्मचाऱ्याच्या रागात बंगला चक्काचूर झाला आहे. घटनेचा व्हिडीओ एका स्थानिक व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजर्सने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "हे असे करणे योग्य नाही, आमच्या लेक हाऊसजवळील मरीना बंगल्याजवळील हा प्रकार आहे. नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याने जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण मरीना बंगला उद्ध्वस्त केला आहे. काय झाले याबद्दल कोणाकडे अधिक माहिती आहे का?."