नवी दिल्ली : सध्या सगळीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत असते. दुकानदार देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. सध्या असाच एका कपड्याच्या दुकानातील पुतळ्याचा फोटो व्हायरल होत आहे, ज्याच्यावर आकर्षित करणारी शेरवानी घालण्यात आली आहे. कधी कधी हे पुतळे खऱ्या माणसासारखेच दिसतात. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोतील पुतळा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा दिसणारा आहे. हा फोटो खूप व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.
'ओबामांचा दिवाळी पोशाख'
हा फोटो व्हायरल होण्याचे कारण म्हणजे पुतळ्याचा चेहरा. खरं तर कपड्याच्या दुकानात उभा असलेला हा पुतळा हुबेहुब अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासारखा दिसतो आहे. ज्याला निळ्या रंगाची शेरवानी घालण्यात आली आहे. हा फोटो १८ ऑक्टोबर रोजी @lilcosmicowgirl या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, ओबामांचा दिवाळी पोशाख. सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भन्नाट जुगाड?
चांदणी चौकात स्वागत
दिवाळीच्या मुहूर्तावर या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मात्र हा फोटो नेमका कोणत्या दुकानातील आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र नेटकऱ्यांनी यावरून मजेशीर मीम्स व्हायरल केले आहेत. काहींनी मजेशीरपणे म्हटले की, लवकरच ओबामा बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहेत. एकाने लिहिले, 'चांदनी चौकात स्वागत आहे', तर काही युजर्संनी लिहले की, भारतीयांचा हा अप्रतिम जुगाड आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"