शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Unique Research:गर्लफ्रेंड शोधत असाल तर प्रोफाईलवर कुत्र्यांसोबत ठेवा फोटो; रिचर्समधून अजब खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 10:32 AM

आताचे युग हे सोशल मीडियाचे असून इथे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार केले जातात.

नवी दिल्ली : आताचे युग हे सोशल मीडियाचे (Social Media) असून इथे मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार केले जातात. गरजू वस्तूंपासून ते जीवनाचा जोडीदार देखील ऑनलाइनरित्या निवडला जाऊ शकतो. मात्र यामध्ये प्रत्येकालाच यश मिळेल असे नाही. कारण एखाद्याला सहजपणे आपला डेटिंग पार्टनर मिळतो तर काहींना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. परंतु आता डेटिंग पार्टनर शोधत असलेल्या मुलांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. कारण सोशल मीडियाच्या प्रोफाईलवरील फोटो कुत्र्यांसोबत (Profile Picture with Dogs) असल्यास त्यांना लगेच गर्लफ्रेंड मिळते असे रिसर्चमधून सिद्ध झाले आहे. 

दरम्यान, स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ जेन (University of Jaen) या विद्यापीठाने केलेल्या रिसर्चमधून हा अजब खुलासा करण्यात आला आहे. जी मुले आपल्या प्रोफाईवर कुत्र्यांसोबत फोटो ठेवतात त्यांना लगेच गर्लफ्रेंड अर्थात डेटिंग पार्टनर Dating Partner) मिळतो असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गर्लफ्रेंडच्या शोधात असलेल्या मंडळीने आपल्या प्रोफाईलवर पाळीव कुत्र्याचा फोटो ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. हे रिसर्च ३०० वेगवेगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थीनींवर केले गेले आहे. जी लोक ऑनलाइन डेटिंग पवर कुत्र्यांसोबत फोटो ठेवतात अशा लोकांना मुलींची अधिक पसंती असते.

कुत्र्यासोबत फोटो लावा आणि मिळवा गर्लफ्रेंडUniversity of Jaen ने केलेल्या रिसर्चमध्ये असे समोर आले की, ज्या ३०० मुलींवर रिसर्च करण्यात आले त्यांनी अशा लोकांना पसंती दिली आहे, ज्यांच्या प्रोफाईल फोटोमध्ये कुत्रा आहे. ऑनलाइन डेटिंग पवर प्रोफाईलवर कुत्रा असलेली मंडळी आम्हाला जास्त आकर्षित करते असा त्यांनी दावा केला. मिररने दिलेल्या वृत्तानुसार, मुलींना काही स्त्री-पुरुष कुत्र्यांसह फिरताना आणि एकटे फिरतानाचे फोटो दाखवण्यात आले होते. या फोटोच्या वेगवेगळ्या पैलूंवर मिळालेल्या उत्तरांचे विश्लेषण केले असता, असे दिसून आले की लहान कुत्र्यांसह प्रोफाईल असलेले मुले मुलींना अधिक आकर्षित करत आहेत. 

लहान कुत्रे आकर्षणाचे प्रमुख कारण मुलींना अंधारात आणि कमी प्रकाशात काढलेले कुत्र्यांचे फोटो दाखवण्यात आले. यामध्ये लहान कुत्रे आणि मोठ्या कुत्र्यांच्याही फोटोंचा समावेश होता. अखेर त्यांनी लहान कुत्र्यांसोबत फोटो असलेल्या मुलांना अधिक प्राधान्य दिले आणि अशी मुले आम्हाला संवेदनशील वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एका मुलीने केलेल्या दाव्यानुसार, हे रिसर्च समोर येताच अनेक मुलांनी लहान कुत्र्यांसोबत प्रोफाईल फोटो ठेवण्यास सुरूवात केली आहे. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाuniversityविद्यापीठResearchसंशोधनdogकुत्रा