VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 01:14 PM2022-08-11T13:14:18+5:302022-08-11T13:18:36+5:30

एका चोराने देवीला नमस्कार करून दानपेटी चोरल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

A thief has stolen 2 donation boxes from a temple in Jabalpur, Madhya Pradesh | VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

Next

जबलपूर : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. यामधील काही गोष्टी लोकांचे मनोरंजन करतात तर काही व्हायरल गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या असाच एक चोरीचा व्हिडीओ खूप व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने तोंडाला कापड बांधून मंदिरातून दानपेटीची चोरी केली आहे. या अनोख्या चोरीची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. चोर सर्वप्रथम देवीला नमस्कार करतो आणि सावधपणे चोरी करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

दरम्यान, चोरी करणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख न पटण्यासाठी तोंडाला कापड बांधले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा हा व्हिडीओ मध्यप्रदेशातील जबलपूर येथील आहे. जिथे एक चोर अनोख्या अंदाजात मंदिरात शिरतो आणि दानपेटीची चोरी करतो. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, निम्मे शरीर उघडे ठेवून चोर हळूच मंदिरात शिरतो प्रथम देवीला नमस्कार करतो आणि नंतर आपला राक्षसी अवतार धारण करतो. तो सर्वप्रथम एक पेटी घेऊन येतो आणि गेटजवळ आणून ठेवतो. नंतर दुसरी पेटी आणतो आणि हळूच मंदिरातून बाहेर पळ काढतो. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे मात्र चोराने चेहऱ्याला कापड बांधल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. 

चोरी करण्याचा अनोखा अंदाज
जबलपूर येथील सुखा गावात घडलेली घटना सर्वांचे लक्ष वेधत आहे. ही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकरी या चोराची खिल्ली उडवत आहेत. तर व्हिडीओ पाहून अनेक सोशल मीडियावरील युजर्संनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत. 


 

Web Title: A thief has stolen 2 donation boxes from a temple in Jabalpur, Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.