बोस्टन : अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागली. माहितीनुसार, ही ट्रेन मिस्ट्रिक नदीवरील पूल पार करत होती तेवढ्यात अचानक ट्रेनच्या डब्ब्यांना आग लागली. आगीच भडका होताच ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेन नदीवरील पुलाच्या एकदम मध्यभागी होती आणि ट्रेनचे सर्व दरवाजे देखील बंद होते. अशा स्थितीत प्रवाशांना एमरजेंसी खिडकीचा वापर करून बाहेर पडावे लागले.
दरम्यान, ही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेनला आग लागल्यामुळे एका महिलेने चक्क नदीत उडी मारली त्याचीही व्हिडीओ समोर आली आहे. नदीत उडी मारणारी महिला सुरक्षित असल्याचे अमेरिकेतील माध्यमांनी सांगितलं आहे.
आग लागल्याने २०० जणांचा जीव धोक्यातट्रेनला आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच बचाव कार्यासाठी घटनास्थळी अग्निशमक दलाची टीम दाखल झाली. माहितीनुसार जवळपास २०० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तर काही लोकांना आधीच ट्रेनमधून बाहेर पडण्यात यश आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनच्या गाडीतून ॲल्युमिनिअम साईडिंगसारखी धातूची पट्टी सुटली आणि वीजपुरवठा असलेल्या तिसऱ्या रेल्वेच्या संपर्कात आल्याने ट्रेनला आग लागली. यानंतर तिसऱ्या रेल्वेचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.