सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे स्कूटी चक्क १५ फूट उंच असलेल्या तारांमध्ये अडकल्याचे दिसते. व्हायरल होत असलेली व्हिडीओ जम्मूमधील असल्याचे बोलले जात आहे. तारांवर अडकलेली स्कूटी पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची एकच गर्दी झाली. पार्लरमध्ये काम करणाऱ्या सनाने सांगितले की, वादळी वाऱ्यामुळे तिची स्कूटी उडून तारांमध्ये जाऊन अडकली.
दरम्यान, वादळ शांत होताच सना सलूनमधून बाहेर आली तेव्हा तिला तिची स्कूटी १५ फूट उंचीवर असलेल्या तारांमध्ये लटकलेली दिसली. बाहेर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी पाहून ती बाहेर आली तेव्हा तिची स्कूटी तारांमध्ये लटकत होती.
स्कूटीची मालक सनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी ती रोज स्कूटी उभी करत होती तिथेच नेहमीप्रमाणे स्कूटी लावली होती. पण जोराने आलेल्या वादळात वायर खाली पडली अन् काही वेळातच स्कूटी तारेसह खांबाच्या मध्ये असलेल्या तारांमध्ये जाऊन अडकली. स्कूटी बराच वेळ तारांमध्ये लटकत होती. मग काही वेळाने क्रेन बोलावून स्कूटीला तारांमधून खाली काढण्यात आले.