Social Viral: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हायरल व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात. सध्या सोशल मीडियावर असाच व्हायरल झालेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय. समुद्रकिनारी भरधाव वेगानं गाडी चालवणं एका माणसाला चांगलच भोवलं आहे.
समुद्र किनारा म्हटलं की शांत वातावरण, किनाऱ्यावर धडकणाऱ्या मोठमोठ्या लाटा यांसारख नयनरम्य दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं. त्यात समुद्रकिनारी फिरणं किंवा रायडिंग करणं हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. अशाच एका चित्तथरारक व्हिडिओने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही लोक काही ऐकायचं नाव घेत नाहीत. हुल्लडबाजी करत आपलंच खरं करण्याची त्यांची वृत्ती अनेकदा मृत्यूच्या जाळ्यात ओढते. याचा प्रत्यय हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईलच.
कुवेतमधील अबू अल हसनिया येथील समुद्रकिनारी एका वाहन चालकाचा झालेला विचित्र अपघात पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. मरण डोळ्यासमोर असताना अगदी थोडक्यात हा वाहन चालक कसा बचावला, हे कोणत्याही चमत्काराशिवाय कमी नाही. हा व्हिडीओ पाहून अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
सध्या कुवेतच्या समुद्रकिनाऱ्यावरील या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. @Kapyoseiin नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. समुद्रकिनारी फिरताना भरधाव वेगात असणारी कार अचानक वाळूवरून स्लीप होते. चक्क एक दोनदा नाहीतर अनेक वेळा ही कार गोलाट्या घेते. मात्र, या वेळी कारमधील माणुस खिडकी बाहेर फेकला जातो. या घडल्या प्रकारानंतर हा वाहनचालक अक्षरश: घाबरल्याचं दिसतोय. व्हिडिओमध्ये हा ३४ वर्षीय चालक कसा-बसा आपला तोल सांभाळत उठून चालतोय. समुद्रकिनारी उपस्थित असलेली माणसं त्या वाहनचालकाला आधार देताना दिसतायत.