Social Viral : भरधाव वेगात स्कुटी चालवताना केवळ फोनवर बोलता यावं, याकरिता महिलेने अनोखी शक्कल लढवली. तिने केलेल्या या जुगाडाची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.
सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. शहरांपासून ते गावगाड्यांपर्यंत इंटरनेटने जवळपास प्रत्येकाचं जीवन व्यापून टाकलंय. काहींना तर मोबाईल शिवाय एक क्षण ही करमत नाही. मोबाईलच्या या घातक व्यसनानं प्रत्येकाला जखडलंय. याचा प्रत्यय बंगळूरुमधील एका महिलेचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आला.
सोशल मीडियावर एका स्कुटी चालवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय. त्यामागील कारणही तितकंच खास आहे. बंगळुरुच्या रस्त्यावर ही महिला सर्सासपणे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत फोनवर बाता मारताना दिसत आहे. पण या कामासाठी आपले हात कामी लावण्यापेक्षा तिने भन्नाट जुगाड केला. तिने केलेला जुगाड पाहून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावलाय.
व्हायरल व्हिडीओनुसार, या महिलेने फोन चक्क कानाला बांधल्याचं दिसतंय. ओढणीने फोन कानाला बांधून भरधाव वेगाने स्कुटी चालवत ही महिला कॉलिंगवर बोलते आहे. या महिलेला नेटकऱ्यांनी चांगलच फटकारलंय.
एक्सवर 'Third Eye' द्वारे हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. महिलेच्या या कृत्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी या महिलेची चांगलीच कानउघडणी केल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ आतापर्यंत ४ लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी पाहिला आहे.