हृदयद्रावक! 'माँ तुझे सलाम' गाताना माजी सैनिक कोसळले; मुलं टाळ्या वाजवत राहिली पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 05:05 PM2024-05-31T17:05:57+5:302024-05-31T17:10:17+5:30

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने असंख्य भारतीयांचं मन हेलावून टाकलं आहे.

a viral video of retired soldier in madhya pradesh indore was died in silent attack while singing patriotic song  | हृदयद्रावक! 'माँ तुझे सलाम' गाताना माजी सैनिक कोसळले; मुलं टाळ्या वाजवत राहिली पण...

हृदयद्रावक! 'माँ तुझे सलाम' गाताना माजी सैनिक कोसळले; मुलं टाळ्या वाजवत राहिली पण...

Social Viral : सोशल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याने मानवी जीवनाची सर्वच अंगे व्यापून टाकली आहेत. त्यावर कधी मनोरंजनात्मक तर कधी माहितीपूर्ण व्हिडीओ समोर येत असतात. थोडक्यात इंटरनेट बऱ्याचदा माणसाला बौद्धिक खुराक पुरवण्याचं कामही करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याने असंख्य भारतीयांचं मन हेलावून टाकलं आहे. माजी सैनिक देशभक्तीपर गीत गात असताना अचानक खाली कोसळले अन् एकच खळबळ माजली. खरं तर ते गीत गात असताना खाली कोसळल्याचं नाटक करत आहे असं समजून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण, बराच वेळ ते उठले नाहीत मग संशय आला आणि सर्वांना धक्का बसला. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ माजी सैनिकाचा आहे. निवृत्त सैनिक भारतमातेचे गीत गात असताना त्यांचा आकस्मित मृत्यू झाला. हातात भारताचा राष्ट्रध्वज घेत निवृत्त अधिकारी 'माँ तुझे सलाम' हे देशभक्तीपर गीत गात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अचानक भर स्टेजवर त्यांचं संतुलन बिघडल्याने ते खाली कोसळले. समोर बसलेल्या मुलांना हे नाटक असल्याचे वाटल्याने ते टाळ्या वाजवत राहिले. पण, बराच वेळ झाला बलविंदर सिंह उठले नाही म्हणून कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांना संशय आला. मग लोक त्यांच्याजवळ जाताच त्यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. 

मध्य प्रदेशातीलइंदौर येथील या घटनेनं सर्वांचे लक्ष वेधलं. अग्रेसन धाम या ठिकाणी आयोजित योग शिबिरामध्ये भारतीय लष्कराचे निवृत्त जवान बलविंदर सिंह छाबडा यांनी भर स्टेजवरच प्राण सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आस्था योग क्रांती अभियन संस्थेच्या माध्यमातून या विनाशुल्क असलेल्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये बलविंदर सिंह छाबडा यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. याचदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. देशभक्तीपर गीत गाताना 'सायलेंट अटॅक' आल्याने या निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याचे कळते.

Web Title: a viral video of retired soldier in madhya pradesh indore was died in silent attack while singing patriotic song 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.