Social viral : लग्न म्हटलं तर डोळ्यासमोर उभी राहते ती लगीन घरातील लगबग आणि यजमानांची धांदळ. सध्या सगळीकडे लग्न सराई सरू आहे. सोशल मीडियाावर लग्नातील हटके उखाणे, डान्सचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. बऱ्याचदा लग्नामध्ये अशाही भन्नाट गोष्टी घडतात जे पाहून आपल्याला हसू देखील आवरत नाही. पण सध्या इंटरनेट या लग्नाची नाही त्यांच्या लग्न पत्रिकेची तुफान चर्चा रंगतेय.
झालं असं की, एका जोडप्याने आपल्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी अशी एक निमंत्रण पत्रिका पाठवली आहे, ती पाहून पाहुणेच अवाक् झाल्याचं पाहायला मिळतंय. या कपलने लोकांना लग्नात सहभागी होण्यासाठी चक्क नियम घातले आहेत. या पत्रिकेत एक-दोन नव्हे तर १५ नियमांची यादी छापण्यात आली आहे. पण, ही पत्रिका नेमकी कुठली आहे? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
या पत्रिकेमध्ये लिहलेले नियम चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. या लग्नपत्रिकेच्या नियमांमधील पहिला नियम असा,
१) लग्न तुमचे नाही. तसेच नवरदेव आणि नवरीचे नाव लिहत हे पाहुण्यांना सांगण्यात आलंय.
२) लग्नामध्ये फोटोग्राफरच्या मार्गात येऊ नका. अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
३) या लग्नकार्यात काळ्या किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करावे. लाल, निळा तसेच पांढऱ्या रंगाचे कपडे अजिबात घालून येऊ नका. असं बजावण्यात आलं आहे.
४) समारंभात खुर्च्यांची अदलाबदल करू नका.
५) लग्नामध्ये वाजवण्यात येणारे संगीत आवडत नसेल तर सरळ आपल्या घरी जावे.
६) सीटिंग अरेंजमेंटमध्ये बदल करू नका. शिवाय सीटिंग चार्जेस आम्ही काही कारणास्तव आकारले आहेत.
७) जर तुम्ही लग्नात आहेराचे पैसे दिले नसतील तर तुमच्याकडे जे काही आहे ते तुमच्याचकडे ठेवा.
८) ड्रिंक करताना संयम बाळगा.
९) या लग्नकार्यात कोणातीही मोठी अनाउन्समेंट होणार नाही आहे. १०) लग्नामध्ये संपूर्ण रात्रभर थांबू नये.
११) तसेच बाहेरून दारू आणु नये.
१२) लग्नाचे फोटो पोस्ट करणार असाल तर त्यासाठी हॅशटॅग कोणता द्यायचा हे देखील सांगितलं आहे.
१३) सुरूवातीचे नियम लक्षात ठेवा.
१४) नवरा-नवरीने जे काही सांगितलं आहे .
१५) त्यासाठी नियमांची यादी पुन्हा वाचा.
अशी नियमांची अख्खी यादी या पत्रिकेत छापण्यात आली आहे.