किस करणं ही प्रेम व्यक्त करण्याची एक भावना आहे. मग तो किस आई-वडिलांना असो, मुलांना असो, पत्नीला असो वा गर्लफ्रेन्डला असो. पण तुम्ही कधी तुम्ही कल्पनाही केली नसेल की, किस केल्याने कुणाचा मृत्यूही होऊ शकतो. एका तरूणीला अशीच भिती वाटते की, किस केल्याने तिचा जीव जाऊ शकतो. यामागचं जे कारण आहे तेही हैराण करणारं आहे.
ही तरूणी अमेरिकत राहणारी असून तिने दावा केला आहे की, कुणाला किस केल्याने तिचा मृत्यू होऊ शकतो. या तरूणीला एक गंभीर एलर्जी आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. तरूणीने सांगितलं की, तिला मास्ट सेल एक्टिवेशन सिंड्रोम नावाचा आजार आहे. खाण्या-पिण्याच्या काही गोष्टींमुळे तिच्या शरीरात एलर्जी होऊ लागते.
तरूणीने सांगितलं की, मास्ट सेल एक्टिवेशन सिंड्रोम एक इम्यून सिस्टीमसंबंधी खाद्यपदार्थांमुळे होणारी एलर्जी आहे. यामुळे तरूणी सेल्समध्ये गंभीर एलर्जी निर्माण होते. असं झाल्यावर सूज, श्वास घेण्यास त्रास, पित्त, जुलाब, उलटी आणि इतर काही गंभीर समस्या होतात.
बोस्टनमध्ये राहणाऱ्या या तरूणीने व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या दुर्मिळ आजाराबाबत गमतीदारपणे माहिती दिली. ती म्हणाली की, मला किस करण्याची ईच्छा असणाऱ्या तरूणांसाठी काही अटी आहेत. त्या पूर्ण केल्यावर कुणीही मला किस करू शकतं.
तरूणीने सांगितलं की, माझी पहिली अट ही आहे की, मला किस करण्याच्या २४ तासआधी तरूणाने शेंगदाणे, तीळ, कीवी, मोहरी किंवा सी फूड खाऊ नये. कारण मला या गोष्टींपासून एलर्जी आहे. दुसरी अट ही आहे की, मला किस करण्याच्या तीन तासआधी ते काहीच खाऊ शकत नाहीत. तसेच तिसरी अट ही आहे की, किस करण्याआधी त्यांना दात ब्रश करावे लागतील.
तरूणीने असंही सांगितलं की, मी एकटी नाहीये. माझा एक बॉयफ्रेन्ड आहे. त्याच्यासोबत रोमान्स करताना मला सामान्य एलर्जीचा सामना करावा लागला. किस केल्यावर माझ्या तोंडात खाज येते. माझे ओठ आणि जिभेवर खाज येते. चेहरा थोडा लाल होतो आणि डोक्यात चक्कर येऊ लागतात. मग मी माझे दात ब्रश करते आणि बेनाड्रिलसारखं औषधाचं सेवन करते.