हा फोटो पाहिल्या पाहिल्या मन हळवं होतं. हा फोटो आहे अमेरिकेतील मिसीसिपीचा. रस्त्याच्या कडेला एक सोफा आणि त्यावर कुत्रा बसला होता. हा कुत्रा मरण्याच्या स्थितीत होता. असं वाटत होतं की, हा कुत्रा गेल्या काही दिवसांपासून इथे बसूनच मालकाची वाट बघत आहे. त्याने काही खाल्लं देखील नाही. कदाचित त्याला वाटले असेल की, त्याचा मालक येईल आणि त्याला घेऊन जाईल. पण असं काही झालं नाही.
एक महिला याच रस्त्याने जात होती. तिने तिची कार थांबवली आण अॅनिमल कंट्रोल सर्व्हिसला फोन केला. Sharon Norton ने फेबसुकवर याबाबत एक पोस्ट लिहिली. त्याआधी तिने कुत्र्याला काही खाण्यासाठीही दिलं.
या पोस्टवर Sharon Norton ने लिहिले होते की, जे कुणी या कुत्र्याला इथे सोडून गेलंय, त्याला लाज वाटली पाहिजे. हा कुत्रा हळूहळू मरतोय. तो सोफ्यावरून उठलाच नाही, फक्त मालकाची वाट बघत बसला. या पोस्टवर यूजर्स या कुत्र्याच्या मालाकावर जोरदार टिका करत आहेत. अजूनही हा कुत्रा कुणाचा आहे, याची माहिती मिळालेली नाही. अमेरिकेत मोकाट कुत्री नसतात, इथे प्रत्येक कुत्र्याचा कुणीना कुणी मालक असतो.