Trending Video : गेल्या काही काळापासून गरमी वाढत आहे, त्यामुळेच अनेकजण आपल्या घरात AC बसवतात. गरम हवा बाहेर फेकणारे ACचे कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट घराबाहेर बसवले जाते. शहरांमध्ये टोलेजंग इमारतींवर तुम्ही अनेकदा अशाप्रकारचे AC कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट पाहिले असतील. हे पाहून तुम्हाला कधी प्रश्न पडतो का की, हे इतक्या उंचीवर बसवले कसे जातात? सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल.
व्हिडिओ व्हायरल...सध्या सोशल मीडियावर एका AC टेक्निशियनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो अनेक मजली इमारतीवर AC चे कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट बसवताना दिसतोय. विशेष म्हणजे, यासाठी तो चक्क खिडकीबाहेर दोरीच्या सहाय्याने लटकतो. व्हिडीओतील व्यक्ती अतिशय चतुराईने स्वतःला इमारतीच्या भिंतीवर झोकून देतो आणि AC चे आऊटडोअर युनिट बसवतो. हे दृश्य पाहून तुमच्याही अंगावर शहारे येतील.
एवढ्या उंचीवर सर्व काही एकट्याने केलेतो टेक्निशियन एकटाच सर्व कामे करताना दिसतोय. त्याचा सहकारी त्याला खिडकीतून एक-एक गोष्टी हातात देतो आणि तो दोरीच्या सहाय्याने ही कामे करतो. ड्रील मशीन चालवणे असेल किंवा कॉम्प्रेसर/आऊटडोअर युनिट उचलून निश्चित ठिकाणी बसवणे असेल, सर्वकाही तो स्वतः करतो. हा व्हिडिओ @HowThingsWork_ नावाच्या X अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत 13.8 मिलियनपेक्षा जास्त व्हू मिळाले आहेत.
या व्हिडिओवर अनेक सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले...या व्यक्तीला कंपनीच्या सीईओपेक्षाही जास्त पगार मिळायला हवा. दुसऱ्या युजरने लिहिले...भाऊ, एवढ्या उंचीवर तू काम करत आहेस आणि भीती मला वाटत आहे. तिसऱ्याने लिहिले...अशा कष्टाळू लोकांकडे पण कधीच लक्ष देत नाही.