ऑफीसमध्ये काम करताना कर्मचारी सतत एकाजागी बसून वैतागतात आणि यामुळे अधे-मधे उठून फेरफटका मारतात. काही वेळाचा ब्रेक घेतात. तर काही कर्मचारी अगदी वॉकलाही जातात. काहींना सोशल मीडियात वेळ व्यतित करण्याची आवड असते. काही तर मोकळ्या वेळेत ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर शॉपिंग करतात. इतकंच काय तर कर्मचारी ऑफीसमध्ये कामाच्या वेळेत लॅपटॉपवर पॉर्न पाहतात अशीही माहिती समोर आली आहे.
तुम्ही जेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी असता तेव्हा अॅडल्ट कन्टेंट वेबसाइटला भेट देणं अनेक कंपन्यांच्या नियमांमध्ये बसत नाही. तरीही अनेक कर्मचारी ऑफीसमध्ये असताना पॉर्न वेबसाइट्सला भेट देत असल्याची माहिती उघड झाली आहे. पॉर्न वेबसाइट्स कंपनीच्या लॅपटॉप किंवा सर्व्हरसाठी अत्यंत धोकादायक मानल्या जातात. कारण यातून सायबर सिक्युरिटीच्या समस्या निर्माण होतात. तसंच कामाच्या वेळी पॉर्न पाहणं आता खूप सर्वसाधारण गोष्ट झाली आहे, असं काही सायकोलॉजिस्ट सांगतात.
डिजिटल लाइफस्टाइल मॅगझीन 'शुगरकुकी'साठी करण्यात आलेल्या एका जागतिक सर्व्हेमध्ये ६० टक्क्यांहून अधिक लोकांनी ऑफीसमध्ये असताना पॉर्न पाहिल्याचं मान्य केलं आहे. तसंच २०२० या वर्षात सिक्युरिटी फर्म कास्पर्सकीकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अर्ध्याहून अधिक कर्मचारी कॉम्प्युटर किंवा मोबाइल फोनवर पॉर्न पाहत असल्याचं मान्य केलं आहे.
जगातील सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट असलेल्या 'पॉर्नहब'नंही लोक कामाच्या वेळेत पॉर्न पाहतात याचं समर्थन केलं आहे. आकडेवारीनुसार लोक रात्री १० ते १ वाजेपर्यंत सर्वाधिक वेळ पॉर्न पाहतात. तर यात अशीही माहिती समोर आली की असेही लोक खूप आहेत की जे दुपारी ४ वाजता पॉर्न पाहतात. ऑफीसची वेळ संपत असताना पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचं यात दिसून आलं आहे.