Flying Bike : भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) अनेकदा सोशल मीडियावर आश्चर्यकारक आणि प्रेरणादायी व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांनी एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला आहे. तुम्ही हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये अनेकदा उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील. आता खऱ्या आयुष्यातही उडणाऱ्या गाड्या पाहायला मिळणार आहे.जपानी स्टार्टअप कंपनी AERWINS Technologies ने हवेत उडणारी बाईक (Flying Bike) लॉन्च केली आहे. XTURISMO नावाची जगातील ही पहिली फ्लांइग हॉवरबाईक डेट्रायट ऑटो शोमध्ये सादर करण्यात आली.
आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात आणि अनेकदा आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करत असतात. आता त्यांनी ट्वीटरवर एका उडणाऱ्या बाईकचा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जपानी स्टार्टअपने उडणारी बाईक सादर केली. यासाठी सुमारे $800K अमेरिकन डॉलर खर्च येईल. ही जगभरातील पोलिस दल वापरू शकेल. अनेक चित्रपटांमधील मनोरंजक चेस सीक्वेन्सही यावर केले जाऊ शकतात.''
कशी आहे ही फ्लाइंग बाईक:
AERWINS ने यापूर्वी ही बाईक जापानमध्ये लॉन्च केली आहे. तिथे याची विक्रीदेखील केली जात आहे. या बाईकच्या लहान व्हर्जनला अमेरिकन बाजारात लॉन्च केले आहे. याची किंमत 800,000 डॉलर (सूमारे 6.5 कोटी रुपये) असेल. या व्हिडिओमध्ये बाईकच्या ट्रायल रनला दाखवण्यात आले आहे. ही बाईक 40 मिनिट हवेत उडण्यास सक्षम असून, याची स्पीड 100 किलोमीटर प्रतितास असेल.