नवी दिल्ली : 'MBA चायवाला' याचे नाव आज भारतभर लोकप्रिय झाले आहे. प्रफुल्ल बिल्लोर याने या नावाने चहाचा व्यवसाय सुरू केला आणि देशभरातील अनेक शहरांमध्ये त्याचे 200 हून अधिक चहाचे आउटलेट्स आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबादसमोर त्याने चहाचा स्टॉल लावून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. पण, आज आम्ही तुम्हाला एका तरुणाबद्दल सांगणार आहोत, जिने उच्च शिक्षण घेतल्यानंतर छोटासा व्यवसाय सुरू केला.
आज आम्ही तुम्हाला 'BTech पाणीपुरीवाली' हिच्याबद्दल सांगणार आहोत. दिल्लीतील टिळक नगर भागात एक तरुण पाणीपुरीचा गाडा लावते. ही मुलगी रस्त्याच्या कडेला मोठ्या उत्साहाने आपला पाणीपुरीचा व्यवसाय करते. ती इंग्रजीत बोलून लोकांना प्रभावितही करते. तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, ही तरुण चक्क बुलेट गाडीमागे आपला मोठा गाडा लावून पाणीपुरी विकते.
पाहा Video:-
व्हिडिओतील तरुणीचे नाव तापसी उपाध्याय(वय 21) आहे. तिने B.Tech पूर्ण केल्यानंतर पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. याबाबत ती सांगते की, अनेकजण तिला हा व्यवसाय करण्यास मनाई करतात. हे काम मुलीचे नाही, असे सांगतात. काही लोक हे काम सोडून घरकाम करण्याचा सल्लाही देतात. पण, तापसीचे मत वेगळे आहे. ती तिचे काम आनंदाने करते. सध्या सोशल मीडियावर हिची खूप चर्चा होत आहे.