कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यानं आता कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण सवयीचा भाग झालं आहे. मास्क, सॅनिटायझर दैनंदिन वापरातल्या वस्तू झाल्या आहेत. बाहेर गेल्यावर सोशल डिस्टिन्सिंग पाळणंदेखील नित्याचं झालं आहे. गेल्या दीड वर्षांपासून जगभरात अशीच परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आता पीपीई किटची सवय झाली आहे. पीपीई किट घातल्यानंतर डॉक्टरांना अतिशय त्रास होतो. घामानं संपूर्ण शरीर भिजतं. मात्र डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी कोणतीही तक्रार न करता हा त्रास सहन करतात.
डॉक्टरांना पीपीई किटची सवय झालेली आहे. मात्र याच पीपीई किटमुळे एका रुग्णालयात भलताच प्रसंग घडला. पीपीई किट घातलेले एक डॉक्टर रात्री एका महिला रुग्णाला तपासण्यासाठी तिच्या बेडजवळ गेले. पीपीई किटमधल्या डॉक्टरांना पाहून महिला किंचाळायला लागली. महिलेची किंकाळी ऐकून शेजारच्या रुग्णाची झोप उडाली. तो उठून बेडवर बसला आणि आजूबाजूला पाहू लागला.
व्हायरल व्हिडीओमध्ये डॉक्टर रुग्णांच्या तपासणीसाठी येताना दिसतात. तितक्यात एक महिला रुग्ण त्यांना भूत समजून घाबरते आणि किंचाळण्यास सुरुवात करते. महिलेची किंकाळी ऐकून बाजूच्या बेडवरील रुग्ण उठून बसतो. पण डॉक्टरांना पाहून त्याचा जीव भांड्यात पडतो. Gidda Company नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.