सोशल मीडियात व्हायरल झालेले सापांचे तुम्ही कितीतरी व्हिडीओ पाहिले असतील. त्यातील अनेक व्हिडीओ पाहून तुम्ही थक्कही झाले असाल. पण आता आम्ही जो व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलोत तसा याआधी नक्कीच पाहिला नसेल. आयएफएफ ऑफिसर सुशांता नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. १६ जुलैला जगभरात World Snake Day साजरा केला जातो. याच दिवशी त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत एक लांबलचक साप झाडावर चढताना दिसतोय. कदाचित इतका लांब साप काही लाोकांनी आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला असेल.
साहजिक गोष्ट आहे की इतका लांब साप पाहिल्यावर लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. जसे की, काही लोक म्हणत आहेत की, या सापाची लांबी २० फूट तर असेलच. पण नेमका हा साप किती फूट लांब आहे हे काही समजू शकले नाही.
या व्हिडीओला आतापर्यंत ७ हजारांपेक्षा अधिक व्हयूज मिळाले आहेत. तर लोक भरभरून कमेंट करत आहेत. हा साप कोणता आहे आणि हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकले नाही. पण इतक्या मोठ्या सापाला अशाप्रकारे झाडावर चढताना पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत तर अनेकजण घाबरले आहेत.
अरे बाप रे बाप! बघा कशी केली १९६ किलो वजनी गोरिलाची टेस्ट, ८ लोकांनी मिळून टाकली नाकात नळी...
VIDEO: संतापजनक! महिलेच्या मानेवर पाय देऊन उभा राहिला पोलीस, हाडही मोडलं अन् १६ टाके पडले...