उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक थक्क करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प, रशिचाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन, यूक्रेन के राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेंस्की आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह कीम जोंग उन हे सोबत गाणे गाताना दिसत आहेत. यांच्याशिवाय इतरही काही देशांचे नेते व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
एक हिलिंग गाणे, ज्याची सध्या आपल्या सर्वांनाच आवश्यकता आहे - हा व्हिडिओ शेअर करत हर्ष गोएंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "जगातील सर्वोच्च नेत्यांनी गायलेले 'वी आर द वर्ल्ड' हे गाणे ऐकत आहे - एक हिलिंग गाणे ज्याची सध्या आपल्या सर्वांनाच अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, माझा आवडता नेता यात नाही! (एआय जनरेटेड व्हिडिओ)". हा व्हिडिओ बघितल्यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे आणि अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
AI ची कमाल -हा व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) मदतीने तयार करण्यात आला आहे. एआयद्वारे जगातील काही बड्या नेत्याचा आवाज आणि चेहरे वापरून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. खरे तर हा व्हिडिओ पाहून लोक संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. तर काही लोक याला मजेदार म्हणत आहेत. हर्ष गोयंका यांचे असे गमतीशीर व्हिडिओ अनेकदा व्हायरल होत असतात.