काही मुलं जात्याच हुशार असतात. त्यांची हुशारी पाहुन भले भले अवाक् होतात. मोठी माणसंही या मुलांशी स्पर्धा करायला गेली तर सपशेल हरतात. एका चिमुकल्यानेही आपल्या बुद्धीनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. या मुलाने वयाच्या १२ व्या वर्षी अँटवर्प विद्यापीठातून फिजिक्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. तो जगात कमी वयात ग्रज्युएट होणारा तिसरा मुलगा ठरला आहे.या मुलाचे नाव आहे लॉरेंट सिमंस आणि तो बेल्जिअमच्या ऑस्टेंड शहरात राहतो. या ११ वर्षाच्या सिमंसने ही डिग्री केवळ एका वर्षात पूर्ण केली. जी पूर्ण करण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतात. डचच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राशी बोलताना तो म्हणाला, की मला मी लहान आहे याने काहीच फरक पडत नाही. जास्तीतजास्त शिकणे आणि माहिती मिळवणे हेच माझे लक्ष्य आहे.सिमंस म्हणाला, शरीरातील भाग मॅकेनिकल पार्ट्समध्ये बदलणे हे माझे लक्ष्य आहे. यासाठी मी मार्ग शोधला आहे. तुम्ही याला क्वांटम फिजिक्समधील एखाद्या नव्या माहितीच्या दृष्टीकोनातून बघु शकता. मी सर्वश्रेष्ठ संशोधकांसोबत काम करू इच्छितो. ते कसा विचार करतात हे मला जाणून घ्यायचे आहे.या सिमंसनं दीड वर्षातच आपले उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केले होते. आठव्या वर्षीच त्याने स्कुल डिप्लोमा केला होता.
चिमुकल्याची किमया! अवघ्या ११ व्या वर्षी झाला फिजिक्समध्ये ग्रॅज्युएट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 8:35 PM